DPT NEWS NETWORK ✍️. प्रतिनिधी: अकील शहा
साक्री पोलीसांवर नातेवाईकांनी केले गंभीर आरोप..
साक्री – घटना साक्री शहरातील गवळीवाडा येथे पत्नीचा गळा चिरून खून करुन पतीचा ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना साक्री शहरातील घडली आहे.
उभंड येथे वास्तव्यास असलेल्या किरण मोरे यांचे पती पुरुषोत्तम मोरे सतत काही ना काही कारणाने पत्नी किरण यांचा शारीरिक व मानसिक छळ करत असताना किरण ह्या आपल्या दोन मुली व एक मुलगा सह साक्री शहरातील गवळीवाडा येथे दहा दिवसांपुर्वी राहण्यासाठी आले होते. परंतु काल त्यांचे पती पुरुषोत्तम हे सायंकाळी पत्नी राहत असलेल्या घरात आले. त्या दोघांमध्ये भांडण सुरु झाले असताना पतीने पत्नीचा गळ्यावर चाकुने वार केले. पत्नी किरण ह्या जमीनीवर कोसळल्या व पतीने विषारी औषध प्राशन केले. किरण ह्यांना तात्काळ साक्री ग्रामीण रुणालयात दाखल केले असता डॉक्टरांनी किरण यांना मृत घोषित केले. व पतीला साक्री ग्रामीण रुणालयातुन धुळे येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी मृत झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी साक्री पोलीसांवर देखील गंभीर आरोप केले आहे की किरण ह्या घटना घडल्याच्या एक दिवस अगोदर साक्री पोलीस स्टेशनला पती विरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी गेल्या होत्या परंतु तेथे हजर असलेले पोलीस अधिकाऱ्यानी निजामपुर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यास सांगितले. त्यानंतर किरण हे निजामपुर पोलीस स्टेशनला गेले असता तेथेही त्यांची तक्रार दाखल करून घेतली नाही. जर पोलीसांनी तक्रार दाखल करून घेतली असती तर अशी दुर्दैवी घटना घडली नसती असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटने मुळेही पोलिसांवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.



