नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर खाजगी बसचा अपघात

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अजगरभाई मुल्ला


धुळे :- खाजगी प्रवाशी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्सचा आज सकाळी भीषण अपघात झाल्याची घटना चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे गावाजवळ घडली. सुदैवाने बस पलटी झाली त्याठिकाणी जास्त खोल भाग नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र बसमधील प्रवाशी जखमी झाले आहेत.


सदर अपघात धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सकाळी घडला. खाजगी बस अहमदाबाद (गुजरात) येथून औरंगाबादच्या दिशेने जात होती. दरम्यान सकाळी बस मेहुणबारे (ता. चाळीसगाव) गावाजवळ आली असता चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने गावाजवळील गिरणा पुलाच्या जवळ बस रस्त्याच्या खाली उतरून पलटी झाली. बस पलटी झाल्याने बसमध्ये असलेल्या प्रवाशांनी जोरात आरोड्या मारल्या. मेहुणबारे गावाजवळ झालेल्या या अपघातात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नसून यात बसमधील प्रवाशी जखमी झाले आहेत. सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच मेहुणबारे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यानंतर महामार्ग पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. वाहतूक पोलीसांनी वाहतूक सुरळीत केली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:38 am, April 20, 2026
37°C
कुछ बादल
20 %
3 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 24%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!