नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

रमाई घरकुल आवास योजनेचा हप्ता काढण्यासाठी लाच स्विकारलेल्या अभियंतास एक दिवसाची पोलीस कोठडी –  कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई


DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी:- विकी माने

कोल्हापूर:-  तक्रारदार यांचे आईचे नावे शासनाच्या रमाई आवास घरकूल योजना सन २०२३- २०२८ मधुन लाभार्थी म्हणून १५०,००० रुपये मंजूर झालेले आहेत मंजूर झालेले पैसे ०५ टप्यामध्ये मिळतात त्यातील ०३ टप्याचे १,००,००० लाख  रूपये तक्रारदार यांच्या आईच्या बैंक खात्यावर जमा झालेले आहेत. उरलेले ०२ टप्याने पैसे कधी जमा होणार हे विचारण्यासाठी तक्रारदार हे दिनांक १०/०१/२०२५ रोजी हातकणंगले पंचायत समिती येथे गेले होते त्यावेळी रमाई आवास घरकुल योजनचे काम पाहणारे अविनाश सुतार, ग्रामिण गृहनिर्माण अभियंता विप. उप विभाग बांधकाम हातकणंगले यांना भेटले. त्यावेळी सुतार यांनी तक्रारदार यांचेकडे रमाई आवास घरकुल योजनेचे राहीलेले दोन हप्ते जमा करणेसाठी १३,००० हजार रूपये दया, त्याशिवाय राहीलेले हप्ते जमा होणार नाहीत असे म्हणून तक्रारदार याकडे लाचेची मागणी केली असल्याची तक्रार तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग  कोल्हापूर येथे दिलेली होती
तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर  येथे दिलेल्या तकार अर्जाप्रमाणे पडताळणी केली असता पडताळणीमध्ये, तक्रारदार यांचेकडे अविनाश सुतार, ग्रामिण गृहनिर्माण अभियंता नि.प. उप विभाग बांधकाम हातकणंगले यानी १३,००० हजार  रुपयांची मागणी करून तडजोडीअंती १०,०००हजार रुपयांची लाच मागणी केलेचे निष्पन्न झाले नंतर सापळा कारवाई आयोजीत करण्यात आली. त्यामध्ये पंच व साक्षीदारांचे समक्ष अविनाश सुतार, ग्रामिण गृहनिर्माण अभियंता जि.प. उपविभाग बांधकाम हातकणंगले यांनी तक्रारदार यांचेकडुन १०,०००हजार  रूपये लाच रक्कम स्विकारताना पकडणेत आले.
आरोपी अविनाश अशोक सुतार, वय ३३ वर्षे, पद ग्रामीण गृहनिर्माण अभियंता, जि.प.उप विभाग बांधकाम हातकणंगले, पंचायत समिती हातकणंगले जि. कोल्हापूर (अस्थायी), रा. हनुमान मंदिर जवळ, हासुर दुमाला, ता. करवीर, जि. कोल्हापूर यांचेविरूध्द गांधीनगर पोलीस ठाणे, जि. कोल्हापूर येथे दिनांक २१/०१/२०२५ रोजी गुन्हा दाखल करून आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाकडुन १ दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:09 am, April 20, 2026
35°C
छितरे हुए बादल
23 %
11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 43%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!