नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

मिलिंद इंगळे हे महाराष्ट्र एक्सलन्स अवार्ड आणि कामगार समाज गौरव पुरस्काराने सन्मानित

(मलकापूर आणि पुणे येथून एकाच महिन्यात दोन पुरस्कार)

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨

मुर्तिजापूर येथिल युवा साहित्यीक व पत्रकार मिलिंद इंगळे यांना मलकापूर येथील महाराष्ट्र ग्रामीण न्युज व हिंदी मराठी पत्रकार संघ मार्फत महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील कर्तुत्वान व्यक्तींचा गौरव करण्याच्या उद्देशाने व त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र एक्सलन्स अवार्ड २०२५ चे आयोजन मलकापूर येथिल भगवान महावीर भवनमध्ये करण्यात आले होते, यावेळी मिलिंद इंगळे मुर्तिजापूर यांना उत्कृष्ट पत्रकार व साहित्यीक म्हणून २०२५ चा महाराष्ट्र एक्सलन्स अवार्ड देऊन सन्मानित करण्यात आले,या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी निलेश तायडे सहाय्यक माहिती आयुक्त मंत्रालय मुंबई होते तर प्रमुख पाहुणे अशांत भाई वानखडे संस्थापक अध्यक्ष समतेचे निळे वादळ, धनश्रीताई काटीकर पाटील महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हिंदी मराठी पत्रकार संघ प्रसाद भाऊ जाधव राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष, बाळासाहेब दामोदर उद्योजक, बंडू भाऊ चवरे कांग्रेस नेते, फारुक शेख लोकमत ज्येष्ठ पत्रकार, दामोदर शर्मा शेतकरी नेते, वीरसिंहदादा राजपूत ज्येष्ठ पत्रकार उपस्थित होते.
त्यानंतर आठवड्यातच स्वराज फिल्म प्रोडक्शन संघटना महाराष्ट्र राज्य आयोजित कामगार दिनाच्या निमित्ताने भव्य सांस्कृतिक स्पर्धा आणि कामगार कला गौरव पुरस्कार सोहळा पुणे येथे संत तुकाराम नगर पिंपरी चिंचवड पुणे मधील आचार्य अत्रे सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
या सन्मान सोहळ्यात मिलिंद इंगळे मुर्तिजापूर यांना २०२५ चा “राज्यस्तरीय कामगार समाज गौरव पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले… या सोहळ्यामध्ये समाज गौरव पुरस्कार २०२५… श्री. मेघराज भैय्या भोसले, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, पुणे… श्री. मिलिंद दास्ताने (अभिनेते)… श्री. बाळासाहेब बांगर (निर्माते, सत्यशोधक चित्रपट)… श्रीमती रिटा पुणेकर (समाजसेविका, अभिनेत्री, रिल स्टार) व इतर मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
या पुरस्काराचे मानकरी सत्यशोधक मराठी चित्रपटाचे निर्माते बाळासाहेब बांगर, विशाल शिंदे सातारा, दौलतराव पाटील उर्फ महेश सांगली, मिलिंद इंगळे मुर्तिजापूर, काजल शिंदे आळंदी, घनश्याम दराडे छोटा पुढारी , अभिनेता मिलिंद दास्ताने इत्यादी कलाकारांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन स्वराज्य फिल्म प्रोडक्शनचे संस्थापक अध्यक्ष गिरीश राजुरकर यांनी केले होते.
त्याप्रसंगी उपस्थित दुर्गामाता चॅरिटेबल फाउंडेशनच्या संचालिका सोनाली मॅडम, स्वयंसेविका स्वाती मॅडम, स्वयंसेविका मयुरी मॅडम, स्वयंसेवक मंगेश सर, स्वयंसेवक सिद्धार्थ सर, स्वयंसेवक महेश उर्फ दौलतराव पाटील सर, संचालक विशाल सर… प्रफुल्ल सुर्यकार,पुजा सुर्यकार यावेळी मित्र मंडळी उपस्थित होती.
हे दोन्ही पुरस्कार मिळाला बद्दल विविध संघटना व विविध संस्थे मार्फत अभिनंदन करण्यात आले.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:27 pm, February 26, 2026
31°C
साफ आकाश
23 %
12 Km/h
Wind Gust: 14 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!