नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

Hero आणि Mahindra ने लाँच केले स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर, किंमत ५५ हजार ५८० रुपयांपासून सुरू, शानदार रेंज

Hero Electric आणि Mahindra Group ने आपल्या पार्टनरशीप अंतर्गत पहिली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. या दोन्ही ऑटो कंपनी अंतर्गत लाँच करण्यात आलेल्या स्कूटरचे नाव ऑप्टिमा (Optima) आहे, जाणून घ्या या संबंधीची सविस्तर माहिती.

नवी दिल्लीः हीरो इलेक्ट्रिक (Hero Electric) आणि महिंद्रा समूह (Mahindra Group) ने आपली स्ट्र्रॅटेजिक पार्टनरशीप अंतर्गत आपले पहिले इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केले आहे. या स्कूटरला ऑप्टिमा (Optima) नावाने लाँच केले आहे. ही स्कूटर मध्य प्रदेशच्या पीथमपूर् येथील प्लांटमध्ये मॅन्यूफॅक्चरर करण्यात आले आहे. दोन्ही कंपन्यांनी नुकतेच आपल्या पार्टनरशीपची घोषणा केली होती. ही पार्टनरशीप ५ वर्षासाठी आहे. ज्यात जवळपास १५० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. महिंद्रा समूह सोबत करण्यात आलेल्या या पार्टनरशीपच्या मदतीने हीरो इलेक्ट्रिक दरवर्षी १० लाख इलेक्ट्रिक व्हीकल्जचे प्रोडक्शनचे टार्गेट सेट करण्यात आले आहे. पार्टनरशीप अंतर्गत दोन्ही कंपन्या मिळून इलेक्ट्रिक टू व्हीलर्ससाठी सप्लाय चेन सुद्धा डेव्हलप करणार आहे.

Optima चे फीचर्स
हिरो इलेक्ट्रिकने ऑल न्यू ऑप्टिमा स्कूटरला गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात आणले होते. यानंतर ऑप्टिमाच्या लाँचिंगची चर्चा सुरू झाली होती. या स्कूटर मध्ये अनेक जबरदस्त फीचर्स दिले आहेत. ऑप्टिमा इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये क्रूझ कंट्रोल फीचर्स दिले आहेत. हे फीचर स्कूटर ड्राइव्ह करीत असलेल्या व्यक्तीला एकसारखी स्पीड देते. या फीचरचे खास वैशिष्ट्ये म्हणजे रायडर आपल्या सुविधेनुसार, स्पीड सेट करू शकते. स्कूटरमध्ये या क्रूझ फंक्शनला अॅक्टिव करण्यासाठी क्रूझ कंट्रोल बटन सुद्धा दिले आहे. ज्याला अॅक्टिव केल्यानंतर स्पीडोमीटर मध्ये क्रूझचा सिम्बॉल दिसतो. याला ब्रेकिंग किंवा थ्रॉटलद्वारे आपल्या सुविधेनुसार, कधीही अॅक्टिव केले जावू शकते.

रेंज आणि किंमत
किंमत रेंज नुसार, हे स्कूटर खूप चांगली रेंज ऑफर करते. सिंगल चार्जवर तुम्हाला ही स्कूटर ८२ किमी पर्यंत रेंज देवू शकते. यात BLDC मोटर द्वारे 550 W चे पॉवर मिळते. तसेच याला फुल चार्ज करण्यास ४ ते ५ तासाचा वेळ लागतो. ब्रेकिंग मध्ये यात फ्रंट ब्रेक ड्रम, रियर ब्रेक ड्रम तुम्हाला मिळू शकतात. हिरो इलेक्ट्रिक ऑप्टिमा HX (Hero Optima HX) एक्स-शोरूम किंमत ५५ हजार ५८० रुपये (एक्स शोरूम) आहे. या स्कूटरला तुम्ही ४ कलर्स व्हेरियंट्स मध्ये खरेदी करू शकतात. ज्यात ब्लू, ग्रे, रेड आणि व्हाइट कलर ऑप्शनचा समावेश आहे.

 

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

Dhule
10:55 pm, December 22, 2024
23°
छितरे हुए बादल
Wind: 12 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:03 am
Sunset: 5:55 pm
Translate »
error: Content is protected !!