DPT NEWS NETWORK 🗞️✍️
प्रतिनिधी – निवास गागडे
कोल्हापूरामध्ये १५ ऑगस्ट ७८ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्हा ज्युदो असोसिएशन व कोल्हापूर जिल्हा ज्युदो क्लब यांचेवतीने कै. सौरभ शंकर सुतार यांच्या स्मरणार्थ ज्युदो कराटे स्पर्धेत १४ वर्षा खालील गटातील ११० खेळाडू मुले / मुली यांनी सहभाग घेतला होता. शालेय सब ज्युनियर गटातील ज्युदो स्पर्धा महाराष्ट्र हायस्कूल कोल्हापूर येथे पार पडली. या स्पर्धेत मराठी मिडीयम स्कूल नारायण मळा इचलकरंजी या शाळेतील चार विद्यार्थी खेळाडूंचा प्रथम क्रमांक आला असून कु. सुधांशू शक्ती गागडे वय गट १०-१२ / वजन गट ३० , कु.सोमनाथ विजय गंथले वय गट १०-१२ वजन गट ४५, कु. स्वरूप सुरेश कोकणे वय गट ०८-१० वजन गट २७, कु. नम्रता कांबळे वय गट १२-१४ वजन गट ४० तसेच दुसऱ्या क्रमांकासाठी कु. आसिफ मुध्दसर जमादार वय गट १०-१२ वजन गट+४५, कु. यश जयसिंग सेनी वय गट १०-१२ वजन गट+४५ या खेळाडूंना संस्थेच्या मानस सचिव मा. सपना आवाडे, प्रशालेयाचे मुख्याध्यपक मा गाडेकर सर, क्रीडा शिक्षक बंडगर सर, बचाटे सर व हर्ष शिंदे, वेंकटेश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाने विजेता विद्यार्थी खेळाडूंना प्रमाणपत्र मेडल प्रधान करण्यात आले.