नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

कोल्हापूर जिल्हा अन्नसुरक्षा अधिकारी विकास सोनवणे यांना लाच प्रकरणी अटक.


DPT NEWS NETWORK 🗞️✍️
प्रतिनिधी – सचिन कोळी शिरोळ


कोल्हापूर:- जिल्हा अन्नसुरक्षा अधिकारी विकास सोनवणे यांना ४५००० हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. अधिक माहिती अशी की यातील तक्रारदार यांचे टेस्ट मेंटर्स १०११ कोगे महे रोड, एमएससीबी ऑफीसजवळ, कोगे ता. करवीर जि. कोल्हापूर या नावाची फरसाण व वेफर्स उत्पादन करण्याची फर्म आहे सदर फर्मला अन्न सुरक्षा अधिकारी विकास सोनवणे यांनी दि.०५/०८/२०२४ रोजी किजीट देवून फर्ममधील बेसन, तेल आणि मिरची पावडरचे सॅम्पल घेवून नोटीस दिलेली होती. त्याबाबत तक्रारदार हे अन्न सुरक्षा अधिकारी सोनवणे यांना भेटण्याकरीता गेले त्यावेळी त्यांनी घेतलेल्या सॅम्पलवर कोणत्याही प्रकारची कारवाई न करणेकरीता व तक्रारदार यांचे फर्मचा परवाना रद्द न करणेकरीता विकास सोनवणे यांनी तक्रारदार यांचेकडे ८५,०००/- रु.ची मागणी करून तडजोडीअंती अप्रामाणिकपणे ४५,०००/- रू. मागणी केली.

तकारदार याने अॅन्टी करप्शन ब्यूरो कोल्हापूर येथे तक्रार दिलेली होती. तक्रारदार यांनी अॅन्टी करप्शन ब्यूरो, कोल्हापूर येथे दिलेल्या तकार अर्जाप्रमाणे पडताळणी केली असता पडताळणीमध्ये तक्रारदार यांचे टेस्ट मेंटर्स कोगे ता. करवीर जि. कोल्हापूर या फर्ममधून घेतलेल्या बेसन, तेल आणि मिरची पावडरचे सॅम्पलवर कोणत्याही प्रकारची कारवाई न करण्याकरीता आलोसे यांनी ४५,००० रूपयांची लाच मागणी केलेचे निष्पन्न झाले. लाच लुचपत प्रतिबंध विभागातील अधिकारी यांनी सापळा कारवाई आयोजीत केली असता पंच साक्षीदारांचे समक्ष तक्रारदार यांचेकडून  विकास रोहीदास सोनवणे वय ५० वर्षे, पद अन्न सुरक्षा अधिकारी वर्ग २ सहायक आयुक्का, अन्न औषध प्रशासन, रघुकूल बिल्डींग, सुभाष रोड, कोल्हापूर यांनी ४५,०००/- रूपये लाच रक्कम स्विकारताना त्यांना रंगेहाथ पकडणेत आले. आरोपी लोकसेवक विकास रोहीदास सोनवणे  यांचेविरुध्द जुनाराजवाडा पोलीस ठाणे, कोल्हापूर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
  पोलीस निरीक्षक, बापु साळुंखे अतिरिक्त कार्यभार पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि कोल्हापूर, महा पोलीस उपनिरीक्षक  प्रकाश भंडारे, पो. हे करें ,  विकास माने, सुनिल घोसाळकर, पो ना. सचिन पाटील, पो. ना. सुधीर पाटील, मपोना संगिता गावडे, चा.पो.कॉ. प्रशांत दावगे अॅन्टी करप्पान ब्यूरो, कोल्हापूर यांचे कडुन कारवाई करण्यात आली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:24 am, July 19, 2026
30°C
घनघोर बादल
53 %
10 Km/h
Wind Gust: 19 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 5:59 am
Sunset: 7:14 pm
Translate »
error: Content is protected !!