नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

निर्भीड पोलिसिंगचा बुलंद आवाज – (LCB) वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. हेमंत सुभाष पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या दमदार कामगिरीचा आढावा..!

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी प्रविण चव्हाण

नंदुरबार – कायद्याचा धाक म्हणजे फक्त भीती नव्हे, तर न्यायाची खात्री… आणि हीच खात्री जनतेच्या मनात निर्माण करणारे नाव म्हणजे नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. हेमंत सुभाष पाटील. आपल्या ठाम, निर्भीड आणि परिणामकारक कार्यशैलीमुळे त्यांनी पोलीस दलात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

*२ एप्रिल रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कर्तृत्वाचा हा विशेष आढावा.*

गुन्हेगारीला थेट भिडण्याची आणि कोणतीही तडजोड न करण्याची भूमिका हेच श्री.पाटील यांचे वैशिष्ट्य. त्यांनी २०२४ पासून आतापर्यंत नंदुरबार जिल्ह्यात गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवत अनेक गंभीर गुन्हे उघडकीस आणले आहेत. विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गंभीर गुन्ह्यांचा तपास करताना सोने-चांदीचे दागिने, मोबाईल, वाहने तसेच कृषी माल अशा लाखो रुपयांच्या मुद्देमालाची जप्ती करण्यात आली आहे.

*मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांवर त्यांनी केलेली कारवाई* विशेष उल्लेखनीय ठरते. नंदुरबारसह तळोदा, शहादा, विसरवाडी, सारंगखेडा परिसरातील गुन्हे उघड करत अनेक मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या. इतकेच नव्हे, तर इतर जिल्हे व राज्यांतील गुन्ह्यांचाही छडा लावत गुन्हेगारी साखळी मोडून काढण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

*एनडीपीएस* कायद्यांतर्गत त्यांनी घेतलेली धडक कारवाईही तितकीच प्रभावी आहे.

*गांजासारख्या* अमली पदार्थांवर कठोर कारवाई करत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

*त्याचबरोबर* नायलॉन मांजा, अवैध गॅस वापर, वाळू तस्करी आणि बनावट इंजेक्शन, तूप यांसारख्या समाजासाठी घातक बाबींवर कठोर कारवाई करत त्यांनी *गुन्हेगारीला लगाम घातला आहे.*

*विशेष कामगिरीने मिळवले वेगळेपण*

पारंपरिक गुन्ह्यांबरोबरच श्री.हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली समाजाच्या आरोग्याशी संबंधित गंभीर गुन्ह्यांवरही मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे.

नवापूर एमआयडीसी परिसरात बनावट तूप तयार करणाऱ्या कारखान्यावर धाडसी छापा टाकत तब्बल *१ कोटी ४६ लाख रुपयांचा मुद्देमाल* जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे अन्नभेसळीविरोधात कडक संदेश गेला असून नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यात मोठे योगदान मिळाले आहे.

तसेच मानवी व जनावरांच्या आरोग्यास घातक ठरणारे भेसळयुक्त दुधाचे प्रमाण वाढविण्यासाठी वापरले जाणारे रसायन तयार करणाऱ्या टोळीवरही कारवाई करण्यात आली असून या प्रकरणात *२ आरोपींना ताब्यात घेऊन २० लाख २० हजार ३२ रुपयांचा मुद्देमाल* जप्त करण्यात आले असून या कारवाईमुळे भेसळयुक्त दूध प्रकरणावर मोठा आळा बसला आहे.

*आकडेवारीच सांगते कर्तृत्व…*

श्री.हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली ६ खून प्रकरणे उघड करून १४ आरोपींना अटक करण्यात आली. दरोड्याचे २ गंभीर गुन्हे उघड करत १६ आरोपींना पकडून तब्बल ३४ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त करण्यात आला असून जबरी चोरी, घरफोडी आणि चोरी या गुन्ह्यांमध्ये शेकडो आरोपींना निष्पन्न करून कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

घरफोडीच्या ३० पेक्षा अधिक गुन्ह्यांमध्ये ५० आरोपींना अटक करत ४४ लाखांहून अधिकची मालमत्ता जप्त करण्यात आली, तर चोरीच्या २० पेक्षा अधिक गुन्ह्यांमध्ये ८८ आरोपींना पकडून जवळपास ९० लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. NDPS अंतर्गत १३+ कारवायांमध्ये २० आरोपींना अटक करत ५१ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अग्नीशस्त्र, गुटखा, जीवनावश्यक वस्तू कायदा तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गतही प्रभावी कारवाया करत त्यांनी कायद्याची कडक अंमलबजावणी सुनिश्चित केली आहे. जिल्ह्यातील १३ पाहिजे आरोपींना शोधून काढणे आणि मोक्का गुन्ह्यातील आरोपीला ताब्यात घेणे ही त्यांच्या कार्यातील अचूकता आणि चिकाटी दर्शवणारी उदाहरणे आहेत.

*जनतेचा विश्वास – गुन्हेगारांना धाक*

श्री. हेमंत पाटील यांच्या स्पष्ट, ठाम आणि निर्भीड भूमिकेमुळे गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, तर सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना दृढ झाली आहे. त्यांचे काम केवळ गुन्हे उघड करणे नाही, तर समाजात न्याय आणि विश्वास निर्माण करणे आहे.

*धुळे–नाशिक येथील उल्लेखनीय कारकीर्द*

*नंदुरबारपूर्वी* धुळे व नाशिक जिल्ह्यात LCB प्रभारी म्हणून कार्यरत असताना श्री. हेमंत पाटील यांनी अतिगंभीर व न उघडकीस आलेल्या क्लिष्ट गुन्ह्यांचा सखोल तपास करत अनेक महत्त्वाचे गुन्हे उघडकीस आणले.

त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत *२०२० साली भारत सरकारच्या गृहमंत्र्यांकडून विशेष सेवापदकाने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.*

वाढदिवसानिमित्त अभिवादन
कर्तव्य, प्रामाणिकपणा आणि निडरतेचा आदर्श ठेवणारे श्री. हेमंत सुभाष पाटील यांना वाढदिवसानिमित्त उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील कार्यासाठी भरभरून यश लाभो, अशा मनःपूर्वक शुभेच्छा!

*अशा कर्तव्यदक्ष, दबंग आणि जनतेच्या विश्वासाचे प्रतीक असलेल्या अधिकाऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!*

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:59 am, July 19, 2026
29°C
घनघोर बादल
59 %
13 Km/h
Wind Gust: 19 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 5:59 am
Sunset: 7:14 pm
Translate »
error: Content is protected !!