🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी – नारायण कांबळे
कोल्हापूर जिल्ह्यात बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणाऱ्या आणि त्याची विक्री करणाऱ्या समाजकंटकांवर कोल्हापूर पोलिसांनी जोरदार कारवाईचा बडगा उगारला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) धडक कारवाई करत शिरोली एमआयडीसी परिसरातुन एका तरुणाला अटक केली असून त्याच्याकडून गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस आणि मोबाईल असा एकूण १,००,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वरिष्ठांचे मार्गदर्शक आदेश: पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी कोल्हापूर जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणारे, विक्री करणारे आणि वाहतूक-तस्करी करणाऱ्या इसमांवर कडक कारवाई करण्याचे आदेश सर्व पोलीस ठाणे प्रमुखांना दिले होते.
गोपनीय खबऱ्यामार्फत मिळाली माहिती या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी पथके तयार केली. यादरम्यान शाखेचे पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, राहुल संजय मोरे (वय २२, रा. जयभीमनगर झोपडपट्टी, इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) याच्याकडे बेकायदेशीर पिस्तूल असून तो ते विक्री करण्यासाठी येणार आहे.
सापळा रचून अटक: आरोपी हा एन.एच. ४८ हायवे, सर्व्हिस रोडवरील भारत पेट्रोल पंपजवळ, सांगली फाटा, शिरोली येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर, सहा. पोलीस निरीक्षक संग्राम पाटील आणि त्यांच्या पथकाने तात्काळ सापळा रचला.
दि. १३ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलिसांनी राहुल संजय मोरे याला ताब्यात घेतले. पंचसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे १ गावठी बनावटीचे पिस्तूल, १ जिवंत राऊंड आणि मोबाईल फोन असा एकूण १,००,५०० रुपयांचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करून हस्तगत करण्यात आला.
गुन्हा दाखल व पुढील तपास:
ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपीविरुद्ध शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कायदेशीर तपास शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.
सदरची ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक . अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहा. पोलीस निरीक्षक संग्राम पाटील, पोलीस अंमलदार वैभव पाटील, प्रदिप पाटील, संतोष बरगे, संदीप सावंत, महंद्र कोरवी, सत्यजित तनुगडे, विशाल खराडे, शिवानंद मठपती, सागर चौगले, अरविंद पाटील आणि सतीश सूर्यवंशी यांच्या पथकाने केली आहे.



