🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी निवास गागडे
इचलकरंजी : दक्षिणमुखी हनुमान मंदिर, सम्राट अशोक नगर, इचलकरंजी यांच्या वतीने आयोजित कार्तिकी पायी दिंडी वारी टाळ-मृदंगाच्या गजरात व भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडली.
दिंडी सांगता सोहळ्यानिमित्त शनिवार दि. २८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत *ह.भ.प. धोंडीराम मुधाळे महाराज यांचे प्रवचन व कीर्तन झाले*. यावेळी *मंदिराचे चेअरमन धनाजी डोईफोडे, व्हाईस चेअरमन गणेश जाधव, सुखानू समिती प्रमुख अरुण खोत, संतोष मांगले, निवास गागडे व अमित ठाणेकर* उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते ह.भ.प. धोंडीराम मुधाळे महाराज यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
*दिंडीचे ज्येष्ठ संचालक सर्जेराव जावळे यांनी दिंडीची शोभा वाढवित संपूर्ण दिंडीची माहिती देऊन वारकरी व भाविकांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच दिंडीचे मालक सुरेश सावंत, राजू इंगळे* यांच्यासह सर्व संचालक मंडळाने दिंडी यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
यानंतर चेअरमन धनाजी डोईफोडे व व्हाईस चेअरमन गणेश जाधव यांच्या हस्ते महाप्रसादाचे उद्घाटन करण्यात आले. या महाप्रसादाचा सुमारे दोन ते अडीच हजार माऊली भक्तांनी लाभ घेतला.
यावेळी दिंडी संचालक मंडळातील ह.भ.प. आनंद गुरव, ह.भ.प. चाळप्पा महाराज, ह.भ.प. अनिल जिल्हा, ह.भ.प. लक्ष्मण मुरुडकर, ह.भ.प. सचिन दरे, ह.भ.प. शितल माने, ह.भ.प. रामदास सावंत, ह.भ.प. चंद्र पाटील, ह.भ.प. सुभाष पाटील, ह.भ.प. योगेश आंबोळकर, राजू मांगलेकर, सचिन तासगावे, सर्जेराव जावळे, सुरेश सावंत, राजू इंगळे आदींसह दिंडी सेवक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण दिंडी सोहळा व महाप्रसादाचे आयोजन भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.



