नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

तहसील कार्यालयाच्या वाहन चालकाची तडकाफडकी बदली

* विभागीय आयुक्त कार्यालयात रुजू होण्याचे आदेश

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- अमर मोकाशी –

भिवापूर :- भिवापूर तहसील कार्यालयातील सरकारी वाहनावर तब्बल १२ वर्षे स्थिरावलेले चालक मुकेशकुमार कलचुरी यांची अखेर बदली करण्यात आली आहे. नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात तातडीने रुजू होण्याचे आदेश त्यांना मिळाले असून, शुक्रवारी हे आदेश तहसील कार्यालयात येऊन धडकले आणि खळबळ उडाली!
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी गोंडबोरी फाट्यावर झालेल्या भीषण अपघातात तिघांचा बळी गेल्यानंतर मृतकांच्या नातेवाईकांनी चालक कलचुरीवर गंभीर आरोप करत कारवाईची मागणी केली होती. तहसीलच्या वाहनाने वाळू भरलेल्या टिप्परचा पाठलाग केल्याने टिप्पर चालकांनी त्यांची वाहने भरधाव पळवली त्यात समोरून येणारी दुचाकी चिरडली गेली. दुर्दैवाने चिमुर तालुक्यातील साठगाव येथील एक वृद्ध महिला, तिचा पुतण्या आणि पाच वर्षांचा चिमुकला यांचा जागीच मृत्यू झाला.
“हा अपघात चालकाच्या निष्काळजीपणामुळेच घडला!” असा ठपका मृतकांच्या कुटुंबियांनी लावला होता आणि तीव्र संताप व्यक्त करत न्यायाची मागणी केली होती. दरम्यान, तब्बल १२ वर्षे एकाच ठिकाणी चिकटून बसलेल्या कलचुरीच्या बदलीचे अनेक जण वाट पाहत होते. या बदलीला काहीतरी ‘वजन’ लागेल असेच बोलले जात होते. अखेर आज ती वेळ आली आणि तहसील परिसरात एकच चर्चा रंगली – “ झाली रे बाबा, अखेर बदली झाली!”
स्थानिक नागरिकांतही या बातमीचे आनंदाने स्वागत करण्यात येत असून, “उशिरा का होईना, पण न्याय झाला,” अशा भावना व्यक्त होत आहेत. आता विभागीय आयुक्त कार्यालयात रुजू होताच कलचुरीसाहेबांचा ‘नवा अध्याय’ सुरू होणार, हे मात्र नक्की!

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:33 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!