नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

३१ शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच खाजगी व्यक्तीयांच्यावर न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल..

मा. सदस्य विभागीय अँटी करप्शन कमिटी आयुक्त कार्यालय नाशिक ॲड. कृष्णा मोरे यांना आले यश..

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 🚨 प्रतिनिधी:- संदिप अहिरे

धुळे:- शिंदखेडा तालुक्यातील एमआयडीसी परिसरात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी 31 शासकीय अधिकारी व खाजगी इसमांचा कथित घोटाळाप्रकरणी मा. सदस्य विभागीय अँटी करप्शन कमिटी आयुक्त कार्यालय नाशिक ॲड. कृष्णा मोरे यांनी कागदपत्रांचा पाठपुरावा करत कथीत घोटाळा करणाऱ्या महाभागांचे पितळ उघडे पाडत त्यांच्यावर न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यास ॲड. कृष्णा मोरे यांना यश आले आहे. त्याबद्दल त्यांचे शहरातूनच नव्हे तर राज्यभरातून विविध सामाजिक संघटना व विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांतर्फे त्यांचे पेढे भरवून, फुलगुच्छ देऊन सन्मानित करत कौतुक केले जात आहे.
त्यामुळे त्यांच्या या कामाची दखल जन ग्रामीण पत्रकार संघाने देखील घेतली आहे. जन ग्रामीण पत्रकार संघातर्फे ॲड. कृष्णा मोरे यांना संघाच्या कार्यालयात बोलावून त्यांना फुलगुच्छ देत सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस देखील शुभेच्छा देण्यात आल्या, शुभेच्छा देतेवेळी जन ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्रचे अध्यक्ष शैलेंद्र साळे यांनी कृष्णा मोरे यांना कौतुक करत सांगितले की भविष्यात तुमच्याकडून यापेक्षाही मोठमोठे कामे होत राहो व तुम्ही कायम असेच समाज हितासाठी लढत राहो व दिन दुबळ्या समाजाला न्याय मिळवून देणार अशी अपेक्षा व्यक्त करत जन ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्रतर्फे त्यांना फुलगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सत्कार करते समयी जन ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष शैलेंद्र साळे, प्रदेशाध्यक्ष देवानंद अहिरे राज्य कार्याध्यक्ष युवराज देवरे व सदस्य उपस्थित होते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:30 pm, February 26, 2026
26°C
साफ आकाश
47 %
21 Km/h
Wind Gust: 37 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!