नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

धुळेच्या ‘विद्या निकेतन’च्या १९९१ बॅचचे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले

शाळेच्या जुन्या वास्तूला भेट देत बालमित्रांनी घेतल्या आठवणींच्या गोड वाटा | पुढील स्नेहसंमेलन लासलगाव येथे होणार

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- संदिप अहिरे

धुळे:- शासकीय विद्या निकेतन, धुळे येथील इयत्ता दहावी १९९१ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे दोन दिवसीय स्नेहसंमेलन चांडक फार्म, धुळे येथे दिनांक ३१ मे व १ जून २०२५ रोजी उत्साहात पार पडले.

या स्नेहमेळाव्यात नाशिक राजस्व विभागातील एकूण २० माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. अनेक वर्षांनी पुन्हा एकत्र येण्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. कार्यक्रमाचा विशेष भाग म्हणजे शाळेच्या जुन्या वास्तूला दिलेली भेट. महाराणा प्रताप चौकातील शाळेच्या परिसरात फेरफटका मारत सर्वांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.

शाळेच्या संस्कारांची आठवण जागवताना नवप्रेरणा घेण्याचा संकल्प यावेळी सर्वांनी केला. पुढील स्नेहसंमेलन लासलगाव (जि. नाशिक) येथे आयोजित करण्याचे ठरवण्यात आले.

राष्ट्रगीत म्हणत सर्वांनी कार्यक्रमाचा समारोप केला व कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकमेकांचा मनःपूर्वक निरोप घेतला आणि पुन्हा भेटीची आशा व्यक्त केली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:31 pm, February 26, 2026
26°C
साफ आकाश
47 %
21 Km/h
Wind Gust: 37 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!