नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

मिरजेतील तरुणाकडून पिस्तूल जप्त

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- राजेंद्र पवार

मिरज:- इस्लामपूर बसस्थानक परिसरात पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या जिलानी मकबुल नरगुंद (वय 27, रा. चांद कॉलनी, मिरज) याला इस्लामपूर पोलिस ठाण्याच्या स्थानिक गुन्हे प्रकटीकरण पथकाने अटक केली.
सोमवारी मध्यरात्री पोलिसांनी ही कारवाई केली. जिलानी याच्याकडील 70 हजार रुपये किमतीचे पिस्तूल पोलिसांनी जप्त केले. न्यायालयाने जिलानी याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.
सोमवारी रात्री इस्लामपूर पोलिस पथक गस्त घालत असताना इस्लामपुरात एक व्यक्ती पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलिस निरीक्षक संजय हारूगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस विनोद जाधव, अरुण कानडे, अमोल सावंत, दीपक घस्ते, विशाल पांगे, शशिकांत शिंदे यांच्या पथकाने सापळा लावला. मध्यरात्री 12.41 च्या सुमारास इस्लामपूर बसस्थानक परिसरात जिलानी संशयितरित्या फिरत होता. तो पोलिसांना पाहून पळू लागला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे कमरेला लावलेले पिस्तूल सापडले. त्याला अटक केली. जिलानी याला मंगळवारी येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:02 pm, February 26, 2026
28°C
साफ आकाश
35 %
25 Km/h
Wind Gust: 35 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!