नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

भिसी मार्गे विना रॉयल्टी वाळूची वाहतूक जोरात

“एन्ट्री” वसुलणाऱ्या सोनूला अभय कुणाचे ?

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- सुनिल मैदीले

चंद्रपूर :- भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांतील वाळू भरून येणारे ट्रक व टिप्पर सध्या भिसी (जि. चंद्रपूर) मार्गे मोठ्या प्रमाणावर उमरेड, नागपूर व अन्य भागात पाठविले जात आहेत. विशेष म्हणजे, या सर्व वाहनांकडे ना कुठलीही रॉयल्टी असते, ना कायदेशीर मंजुरी. तरीही या अवैध वाहतुकीकडे प्रशासनाने डोळेझाक केलेली आहे.
मागील काही आठवड्यांपासून या मार्गावर वाळूच्या चोरट्या वाहतुकीला अक्षरशः उधाण आले असून, दिवसरात्र ट्रकचा ओघ सुरू असतो. स्थानिक ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी याकडे वेळोवेळी प्रशासनाचे लक्ष वेधले मात्र अद्याप ठोस कारवाई झालेली नाही.
वाळूच्या या अवैध वाहतुकीत एक नाव समोर येत आहे ते म्हणजे “सोनू” नावाच्या व्यक्तीचे. स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, सोनू हा वाळू भरलेल्या वाहनांच्या “एन्ट्री”साठी ट्रक मालकांकडून महिन्याला एक ठराविक रक्कम वसूल करतो. त्याच्या या “एन्ट्री फंडा”मुळे मोटार मालकांना कोणतीही अडचण येत नाही आणि त्यांची वाहने विना अडथडा भिसी ओलांडून पुढे जातात.
महत्त्वाचे म्हणजे, सोनू हा कोणत्या अधिकाराने ही वसुली करतो आणि या वसुलीतील रक्कम पुढे कुणाला दिली जाते, यावर सध्या अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. स्थानिक पातळीवर असेही बोलले जात आहे की, सोनूच्या पाठीमागे काही राजकीय मंडळींचा अथवा प्रशासनातील काही अधिकाऱ्यांचा वरदहस्त असावा, त्यामुळेच त्याच्यावर कोणतीही कारवाई होत नाही.
या सर्व प्रकारामुळे शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असून, कायद्याचा स्पष्टपणे भंग केला जात आहे. त्यामुळे या अवैध वाहतुकीत गुंतलेल्या टोळीवर कठोर कारवाई करणे अत्यावश्यक बनले आहे. स्थानिक जनतेने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:10 am, April 20, 2026
35°C
छितरे हुए बादल
23 %
11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 43%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!