नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

पोलीस असल्याचे सांगून तिघांनी एकास लुटले

– राजारामपुरी पोलिस ठाणे गुन्हे शोध पथकाची कारवाईत तिघे अटक.
DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- संजय दिंडे

कोल्हापूर:- पोलिस असल्याचे सांगून एकास लुटल्याने राजारामपुरी पोलिस ठाणे गुन्हे शोध पथकाने तिघांना शोध घेऊन अटक केली.
यातील फिर्यादी चिदानंद बामना सुतार जैन बस्ती दत्तवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर हे बांगडयाचा व्यवसाय करतात. बांगडया व कटलरी साहित्य खरेदी करून गांवी जात असताना दुचाकीवरून आरोपी आय्याज युसुफ मुलानी, वय २३, रा. करंजपेठ, सातारा, जि. सातारा, शुभम तानाजी गायकवाड, वय २८, रा. शिकलगार गल्ली, बागल चौक, कोल्हापूर, स्मीत संतोष पवार, वय २१, रा. करंजपेठ, सातारा, जि. सातारा, सध्या रा. शिकलगार गल्ली, बागल चौक, कोल्हापूर या तिघांनी चिदानंद सुतार यांना सात हजार रोख रक्कम आणि दहा हजार रुपये दोन मोबाईल संच पोलिस असल्याचे सांगत अडवून काढून घेतले. या प्रकाराबाबत चिदानंद सुतार यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. राजारामपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी गुन्हे शोध पथकामार्फत शोध घेण्यात आला. गुन्हे शोध पथकाने घटनास्थळापासून सी.सी.टी.व्ही फुटेज पाहुन तपास करीत असताना पोलिस कॉन्सटेबल विशाल शिरगांवकर यांना गोपनिय बातमीदार यांचे मार्फत माहिती मिळाली की, गुन्हयातील आरोपी हे बागल चौकातील शिकलगार गल्ली मध्ये भाडयाच्या घरात राहणेस असलेची खात्रीशीर बातमी मिळालेने पोलिसांनी मिळाले बातमी प्रमाणे एकूण ३ आरोपी यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली. त्यांनी सदरचा गुन्हा आपणच केला असलेची कबुली आरोपी दिली. आरोपींनी पोलीस असल्याचे सांगून काडून घेतलेले रोख रक्कम पैकी ४००० हजार रुपये रोख रक्कम, गुन्हयात वापरलेली ०१ मोपेड व ०२ मोबाईल हँडसेट जसा एकुण ७४,००० हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
राजारामपुरी पोलीस ठाणे मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हयाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सचिन चंदन करीत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:02 pm, February 26, 2026
28°C
साफ आकाश
35 %
25 Km/h
Wind Gust: 35 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!