नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

ग्रामपंचायत फेटरी येथे शिव स्वराज्य दिन सजरा

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- सुनिल मैदीले

नागपूर :- शिव स्वराज्य दिनाचा कार्यक्रम ६ जून रोजी ग्रामपंचायत फेटरी येथे उत्साहात पार पडला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य स्थापनेच्या स्मरणार्थ ग्रामस्थांनी एकत्र येत गुढी उभारून शिव स्वराज्य दिन साजरा केला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच रविंद्र खांबलकर यांनी उपस्थिती लावली. यावेळी उपसरपंच कु. मृणाली दोडेवार, ग्रामसेवक बालाजी गुट्टे, तसेच सुनील दोडेवार, देवानंद ताजने, कमलेश वाघमारे, कोमल लंगडे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात गुढी उभारून करण्यात आली. या गुढीचा उद्देश म्हणजे शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याच्या संकल्पनेचा जागर करणे आणि नव्या पिढीला त्यांच्या पराक्रमाची आणि दूरदृष्टीची ओळख करून देणे हा होता. गावकरी आणि उपस्थित मान्यवरांनी ‘शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमवून टाकला. कार्यक्रमामध्ये शिवराज्य स्थापनेचे महत्त्व, स्वराज्याची मूल्ये आणि शिवाजी महाराजांचे राष्ट्रप्रेम यावर उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. ग्रामस्थांनी देखील या कार्यक्रमाला मोठ्या उत्साहाने प्रतिसाद दिला. शिव स्वराज्य दिनानिमित्त उभारलेली गुढी ही फक्त एक प्रतीक नसून, स्वराज्य, स्वाभिमान आणि स्वसंस्काराचे प्रतीक असल्याचे मत सरपंच श्री. खांबलकर यांनी व्यक्त केले.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:30 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!