DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨प्रतिनिधी – संजय दिंडे
कोल्हापूर:- पन्हाळा तालुक्यातील बोरपाडळे येथील संजिव औद्योगिक सहकारी संस्थेची २०२५ ते २०३० या सालासाठी होणाऱ्या निवडणुकीचा कार्यक्रम कामगार, सभासदांनी निवडणुक अधिकाऱ्यांसमोर एकत्र येऊन सत्तारुढ गटाचा डाव उधळून लावला. बोरपाडळे येथील गट क्रमांक ४५० मध्ये २००० साली संस्थेची स्थापना करणेत आली. संस्थेच्या माध्यमातून परिसरातील लोकाना काम मिळावे. लोकांना घरगुती गॅस उपलब्ध व्हावा याकरीता गॅस प्लॉन्टची निर्मिती केली. १५ ते २० कर्मचाऱ्याची भरती करून त्यांच्या माध्यमातून बोरपाडळे, पन्हाळा परिसरा बरोबर कोल्हापूर,सांगली जिल्ह्यातील २०४४ सभासद संख्येसाठी गोळा करण्यात आले.
संस्थेचे संस्थापक चेअरमन सुभाष झेंडे यांनी आपल्या अधिकारातील तेरा संचालक नेमून गेली पंचवीस वर्षे मनमानी कारभार चालू केला आहे. संस्थेत सुमारे १५ ते २० कामागार भरले असताना सध्या कामगार भरले नसलेचे अधिकाऱ्यांना सांगत आहेत. संस्थेचा सर्व कारभार कागदोपत्री रंगवला जात आहे.
संस्थेवर सुरवातीच्या काळात सेंट्रल बँकेचे लाखो रुपयाचे कर्ज होते. शासनाने कर्ज माफी केली आहे . या कर्जाच्या नावाखाली संस्थेने संस्थेची थोडी जमिन विकली सध्या संस्थेला भाडे मिळत आहे याचे काय केले जाते याची सभासदांना कल्पनामिळत नाही. त्यामुळे सभासदातून नाराजी व्यक्त केली जात होती. या सर्व प्रकाराला कंटाळून तसेच काही कामगारांनी स्वतःचे दागिणे पैसे संस्थेला दिले असताना त्यांना ते परत न देता उलट दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. यासाठी गेल्यावर्षी काही कामगारांनी उपोषण केले होते. त्यामुळे सर्व कामगार नाराज झाले होते. निवडणुक निर्णय अधिकारी एच बी खोत सहाय्यक निबंधक पन्हाळा यांनी निवडणूक संदर्भात सभासदांची मिटींग बोलवली होती. २०४४ सभासदापैकी ५२ सभासद हजर असलेने कामगार व लोकशाही संघर्ष सेना संघटनेने विरोध केल्याने निवडणुक अधिकाऱ्यांनी सदर निवडणूक क. वर्गातून घेणार असल्याचे जाहीर केले. निवडणुक निर्णय अधिकारी सकाळी ठरविले प्रमाणे हजर झाले. निवडणूक कार्यक्रमावेळी कोणीही सभासद हजर नव्हते. याचा फायदा घेत सुभाष झेंडे याने १३ संचालकांची यादी तयार करून त्यावर निवडणुक अधिकाऱ्याची सही घेणे चा प्रयत्न केला. अचानक सभासद हजर झाल्याने चेअरमनचे नियोजन गडबडले. संस्थेचे २०४४ सभासद असताना निवडणुक क वर्गातून घेण्याऐवजी चेअरमन, संचालकांनी निवडणूक ड वर्गातून घेण्याचा घाट का घातला याचे कारण काय या गौडबंगालाची चर्चा सभासद आणि कामगारांच्यातून होत आहे. यावेळी बबन सराटे, महादेव चव्हाण, लोकशाही संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धनाजी सकटे, महाराष्ट्र राज्य युवा आघाडी अध्यक्ष सचिन पोवार सुरेश अवघडे, सुरेश जाधव, सुनिल गराडे, जयसिंग गराडे, बजरंग पाटील, के. वाय. पाटील आदी उपस्थित होते .



