नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

कवितांच्या पावसात भिजला अवघा सृजन संघ

(पावसाळी कवितांच्या सादरीकरणात सृजन साहित्य संघाची मासिक काव्य मैफल संपन्न)

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- मिलिंद इंगळे

अकोला :- मुर्तिजापूर येथील सुपरिचित लोटस् पब्लीक स्कुलच्या हॉलमध्ये सृजन साहित्य संघ व इतर संस्थांच्या सहकार्याने आयोजित काव्यमैफल पावसाळी कवितांमुळे छान रंगली.

मैफलसाठी अध्यक्ष म्हणून गझलकार संदीप वाकोडे व उच्चश्रेणी मुख्याध्यापिका लता सोळंके या प्रमुख आतिथी म्हणून लाभल्या होत्या. या मान्यवरांनी सरस्वती प्रतिमा व ग्रंथपुजन केल्यानंतर, त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. उपस्थित कविंचे शब्दसुमनांनी स्वागत केल्या गेले.

याप्रसंगी केंद्रप्रमुख म्हणुन रवींद्र जवादे व विनोद महल्ले यांचीपदोन्नती झाल्यामुळे शिक्षण विभागाकडून गटसमन्वय कैलास सोळंके सर व साहित्य संस्थांकडून रामकृष्ण आसरे यांनी सत्कार केला. कवी मिलिंद इंगळे यांचा राज्यस्तरीय पुरस्कारासाठी सृजन साहित्य संघा व्दारा सन्मान करण्यात आला. तसेच सेवापुर्तीनिमित्त दिनकर ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला.

यानंतर कविंनी सुंदर पावसाळी कविता सादर केल्यात, त्यामध्ये रवींद्र जवादे, प्रमोद पंत, संदीप वाकोडे, रामकृष्ण आसरे, ज्ञानदेव भड, कमलकिशोर जयस्वाल, लक्ष्मण कुऱ्हेकर, कैलास सोळंके, सुनिल डोंगरदिवे, विनोद महल्ले, लता सोळंके, विद्या गोसावी, वर्षा कावरे, देवयानी कावरे, तृप्ती उंबरकर, मीना जवादे, विलास वानखडे, निलेश उंबरकर, दिनकर ठाकरे, विष्णु लोडम, मिलिंद इंगळे, आमिर हुसेन, विजय इंगळे, कल्पक कांबळे, अरूण तायडे यांच्या रचनांनी मैफलिला रंगत आणली.

गटसन्वयक कैलास सोळंके यांनी कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन केले. आभार विनोद महल्ले यांनी मानले.
रसिक श्रोत्यांनी मैफीलिचा छान आस्वाद घेतला..

गझलदीप प्रतिष्ठान,कलाविष्कार
बहुउद्देशिय संस्था,नेहरू युवा मंडळ, संस्कार भारती,ज्ञाननर्मदा बहु.संस्था या सहयोगी संस्थांनी आयोजनात सहकार्य केले.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:46 am, April 20, 2026
29°C
टूटे हुए बादल
31 %
13 Km/h
Wind Gust: 23 Km/h
Clouds: 74%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!