नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

डॉ. सरोजिनी नायडू विद्यामंदिर शाळेत उत्साहात शाळा प्रवेशोत्सव साजरा

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨प्रतिनिधी:- नारायण कांबळे

कोल्हापूर :- इचलकरंजी,(ता.हातकणंगले) दि. १६ जून २०२५. शहापूर येथील *डॉ. सरोजिनी नायडू विद्यामंदिर शाळा क्रमांक 43* मध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आणि शाळेशी त्यांचे नाते अधिक दृढ करण्यासाठी या कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते.

या प्रवेशोत्सवात इयत्ता पहिलीमध्ये नव्याने दाखल झालेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे फुलांचा वर्षाव करत आणि ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या आनंदात त्यांच्या पालकांनीही मनापासून सहभाग घेतला. शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारापासून रंगीबेरंगी फुगे, फुलांच्या रांगोळ्या आणि आकर्षक स्वागतद्वारे सजवण्यात आले होते, ज्यामुळे संपूर्ण शाळा उत्सवमय वातावरणाने भारलेली होती.

विशेष म्हणजे, शहापूर परिसरातून इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची ढोल-ताशांच्या गजरात भव्य प्रवेशोत्सव फेरी फोर व्हीलर वाहनांमधून काढण्यात आली. या फेरीमध्ये विद्यार्थ्यांनी, पालकांनी व शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. परिसरात या उत्साही फेरीमुळे एक वेगळाच उत्सवाचा माहोल तयार झाला होता. ढोल-ताशांच्या ठेक्यावर विद्यार्थ्यांचे आनंदित चेहेरे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय संतोष सुतार साहेब यांनी भूषविले.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक श्री. विष्णू पाटील सर यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी उपस्थितांना शाळेच्या प्रगतीचा आढावा सादर केला तसेच नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे मन:पूर्वक स्वागत केले.

या कार्यक्रमात इयत्ता पहिलीचे वर्गशिक्षक श्री. आत्माराम गायकवाड सर यांनी नव्या CBSE पॅटर्न अभ्यासक्रम बाबत पालकांचे समुपदेशन केले. त्यांनी नव्या अभ्यासक्रमातील महत्त्वाचे बदल, विद्यार्थ्यांना मिळणारे शैक्षणिक लाभ तसेच पालकांनी घ्यावयाची काळजी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे पालकांमध्ये नवीन अभ्यासक्रमाबाबत स्पष्टता आणि सकारात्मकता निर्माण झाली.

कार्यक्रमात मिकी माउस वेश परिधान केलेल्या दादाने विद्यार्थ्यांचे विशेष आकर्षण ठरले. त्याने आपल्या अभिनय व मजेशीर संवादातून लहानग्यांचे भरपूर मनोरंजन केले. मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेले आनंदी हसू आणि त्यांचा उत्साही सहभाग संपूर्ण वातावरणात आनंदाची लहर निर्माण करणारा ठरला.

शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना गोड जेवणाचे वितरण करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व इतर शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले, जे विद्यार्थ्यांसाठी आनंददायी आणि उपयुक्त ठरले.

या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन शाळेतील अध्यापिका सौ. रुपाली पवार मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी ज्येष्ठ अध्यापिका सौ. सुनंदा मल्लाडे मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:11 am, April 20, 2026
35°C
छितरे हुए बादल
23 %
11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 43%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!