नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

श्रद्धा अकॅडमीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची बहुजन सामाजिक संघाची मागणी

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨प्रतिनिधी:- निवास गागडे

इचलकरंजी :- इचलकरंजी येथील श्रद्धा अकॅडमीने शिक्षणाच्या नावाखाली मोठी आर्थिक लुट करणारी टोळी असल्याचे दिसून येत आहे. 17 जून 2025 रोजी अकॅडमी मध्ये बारावी मध्ये शिकत असलेला विद्यार्थी यश अजित यादव राहणार पलूस जिल्हा सांगली या विद्यार्थ्याने हॉस्टेलमध्ये आत्महत्या केली. ती आत्महत्या नसून आत्महत्येला प्रवृत्त करणारे श्रद्धा अकॅडमी चे मालक तांबे सर आहेत अशी चर्चा चालू आहे. कारण यापूर्वी अशाच घटना या ठिकाणी घडलेचे दिसून आले आहेत. अकॅडमीमध्ये भरमसाठ फी असल्यामुळे काही विद्यार्थ्यांची घरची परिस्थिती गरिबीचे असल्यामुळे ती भरणेस मागे पुढे होते अथवा काही विद्यार्थ्यांना फी भरता येत नाही. अशा विद्यार्थ्यांना फी भरण्यास दबाव केला जातो. विद्यार्थ्यांची मानसिकता बिघडून घरच्या लोकांना त्रास न देण्याच्या हेतूने व अकॅडमीच्या मालकांच्या त्रासाला कंटाळून निष्पाप विद्यार्थ्यांचा आत्महत्या करण्याचा प्रकार घडत असतो.
श्रद्धा अकॅडमी ही सगळ्यात जास्त शिक्षणाच्या नावाखाली आर्थिक लुट करते. अशी चर्चा गावात व परिसरात आहे. अकॅडमी सरकारी कायद्यानुसार चालते का? तेथील सर्व विद्यार्थ्यांना व्यवस्थित रिस्पेक्ट देऊन त्याची सोय व शिक्षण दिले जाते का? असा प्रश्न पडला आहे. तर यापुढे कोणत्याही अकॅडमी व शिक्षण संस्थेमध्ये असा प्रकारे घडू नये याची शासनाने सर्वे करून दखल घ्यावी. शासनाने दक्षता घेऊन सक्तीचे नियम लागू करावेत व कसुन चौकशी करावी. या घटनेच्या मृत्यस कारणीभूत असलेल्या श्रद्धा अकॅडमी चे मालक तांबे हे असून यांच्या त्रासाला कंटाळून यश याला आत्महत्यास प्रवृत केले आहे. असे देखील चर्चा होत आहे. तर अशा मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा तसेच परत असा प्रकार घडणार नाही याची शासनाने खबरदारी घ्यावी याप्रकरणाची सखोल चौकशी व्हावी तसे न झाल्यास बहुजन सामाजिक संघ आक्रमक निर्णय घेण्यास मागे पडणार नाही असे निवेदन इचलकरंजी उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आयुब बागवान, उपाध्यक्ष निवास गागडे, उपाध्यक्ष प्रकाश बनपट्टे, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष इस्माईल एनापुरे, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस हबीब मुल्ला, महाराष्ट्र राज्य सचिव सलीम मुल्ला, महाराष्ट्र राज्य सोशल मीडिया प्रमुख असिफ संजापुरे, कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष बबलू गागडे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:07 am, April 20, 2026
37°C
छितरे हुए बादल
20 %
7 Km/h
Wind Gust: 6 Km/h
Clouds: 36%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!