नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

जन ग्रामीण पत्रकार संघाकडून प्रा. डॉ. नागेंद्र जाधव यांचा सत्कार

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨प्रतिनिधी:- संदीप सकट

कोल्हापूर :- जन ग्रामीण पत्रकार संघ, महाराष्ट्र व वृत्तपत्र दर्शन पोलिस टाइम, पोलिस राऊंड व परिवहन खबरदार यांची कोल्हापूर, सांगली जिल्हा व बेळगांव प्रतिनिधींची कोल्हापूर येथील विश्रामगृहात आढावा बैठक व सत्कार समारंभ संपन्न झाला.
सदर आढावा बैठकीत जन ग्रामीण पत्रकार संघाचे राज्य पदाधिकारी अध्यक्ष शैलैशजी साळे, प्रदेशाध्यक्ष देवानंदजी अहिरे, राज्य कार्याध्यक्ष युवराजजी देवरे यांच्या उपस्थितीत नवीन प्रतिनिधी आनंद कांबळे, जिता मस्के, विलास शिंदोळकर यांना ओळखपत्र व नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. विलास शिंदोळकर यांना दैनिक लोकमत या वृत्तपत्रात देखील त्यांनी अनेक वर्ष काम केले आहे. रविंद्र पवार यांनी चांगले पध्दतीने मार्गदर्शन केले. जन ग्रामीण पत्रकार संघांचे कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. नागेंद्र जाधव यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मुंबई विद्यापीठाची LLB वकिली परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. त्यानंतर मनोगत पर विचार मांडताना प्रा. नागेंद्र जाधव यांनी ‌सर्वांचे आभार मानले. याबैठकीत कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विजय सनदी, सांगली जिल्हा प्रतिनिधी रमजान मुलानी, मिरज तालुका प्रतिनिधी राजेंद्र पवार, विटा खानापूर तालुका प्रतिनिधी डॉ. रविंद्र पवार, चंदगड तालुका प्रतिनिधी संदीप सकट, गडहिंग्लज तालुका प्रतिनिधी संजय शेंडे, योगेश धामणकर, आजरा तालुका प्रतिनिधी तानाजी भोकरे, करवीर तालुका प्रतिनिधी आनंद कांबळे, कोल्हापूर शहर प्रतिनिधी संजय दिंडे, अंकुश दिंडे, सांगली शहर प्रतिनिधी राजेंद्र पवार, इचलकरंजी शहर प्रतिनिधी निवास गागडे उपस्थित होते. पुढील काळात जन ग्रामीण पत्रकार संघ, दर्शन पोलिस टाइम, पोलिस राऊंड व परिवहन खबरदार या वृत्तपत्राचे सर्व प्रतिनिधी यांनी एकत्रीतपणे कोल्हापूर, सांगली व बेळगांव सीमाभागातील सर्व तालुक्यांमध्ये विविध समाजपयोगी उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. आढावा बैठकीचे आभार निवास गागडे यांनी मानले.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:40 am, April 20, 2026
37°C
कुछ बादल
20 %
3 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 24%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!