नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

तीन पाणी जुगार खेळणाऱ्या मालक मॅनेजरसह 13 जणांच्यावर गुन्हा दाखल

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- निवास गागडे

कोल्हापूर :- इचलकरंजीतील शाहू कॉर्नर तारा हॉटेल मागे सुवर्णयुग कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या इमारतीमध्ये इचलकरंजी पोलिसांनी छापा टाकले असता.
घटनास्थळी हातात तीन पानी पत्त्याचा जुगार टेबलवर मध्यभागी चढाओढीने पैसे लावून खेळताना क्लब मॅनेजर व मालक यांनी संस्कृतीक मंडळास घालुन दिलेल्या अटी शर्तीचे उल्लंघण करुन बेकायदेशीरपणे तीन पाणी जुगार खेळणाऱ्या पांडुरंग बाबुराव कांबळे वय 53 सुतारमळा गल्ली नंबर 3 इचलकरंजी, रफिक मलिक मिरजे वय 42 कारंडे मळा शहापूर इचलकरंजी, स्वप्निल तानाजी काळे वय 33 नारायण नगर रिंग रोड इचलकरंजी, संजय विनायक कुलकर्णी वय 53 सम्राट अशोक नगर इचलकरंजी, खंडू ज्ञानदेव वरोटे वय 32 शाहू कॉलनी इचलकरंजी, आयुब हबीब अन्सारी वय 49 हत्ती चौक इचलकरंजी, विश्वनाथ विलास लवटे वय 41 लिंगाडे मळा इचलकरंजी, रोहिदास रमेश शिंदे वय 31 टाकवडेवेस गावभाग इचलकरंजी, विशाल किरण कांबळे वय 24 टाकवडेवेस गावभाग इचलकरंजी ,संतोष विलास बाबर वय 49 हत्ती चौक इचलकरंजी, मोहीम महबूब बैरागदार वय 28 गावभाग इचलकरंजी हे सर्वजण सुवर्णयोग कला क्रीडा संस्कृती मंडळाच्या इमारतीमध्ये हातात तीन पाणी पत्त्याचा जुगार चढाओढीने पैसे लावून खेळत असताना 10,900 रुपये रोख रक्कम 1,60,000 रुपये किमतीचे तीन मोटरसायकल 3)15000 रुपये किमतीचे 06 मोबाईल फोन 20,000 रुपये किमतीचे टेबल खुर्च्या असा एकूण 2,05,900 रुपये मुद्देमाल जप्त केले. त्याचबरोबर जुगाराचा खेळ सांस्कृतिक मंडळास घालून अटी शर्तीचे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे खेळ चालवीत असणारे मॅनेजर व मालक प्रकाश सदाशिव भिसे वय 43 लक्ष्मीतीर्थ वसाहत कोल्हापूर व शहानुर इसाक सावळगी व 48 वार्ड नंबर 10 /774 हत्ती चौक इचलकरंजी यांच्यासह 13 जणांच्या वर 245/2025 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 4 व 5 प्रमाणे इचलकरंजी पोलीस ठाणे इचलकरंजी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:13 pm, February 26, 2026
26°C
साफ आकाश
47 %
18 Km/h
Wind Gust: 33 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!