नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

कर्तव्यदक्षतेचा उत्तम प्रत्यय; हरवलेल्या व्यक्तीचा अवघ्या १५ मिनिटांत शोध!

पोलीस आणि प्रशासनाने दाखवला माणुसकीचा उत्कृष्ट नमुना

DPT NEWS NETWORK 🗞️📹🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी प्रविण चव्हाण

नंदुरबार – येथील रहिवासी संजय पाटील हे 22 जून रोजी कोणालाही न सांगता रागाच्या भरात घरातून निघून गेले होते. कुटुंबीयांनी नंदुरबार परिसरात सर्वत्र शोध घेतला, मात्र त्यांचा कुठेही थांगपत्ता लागत नव्हता.

या घटनेनंतर त्यांच्या नातेवाईकांनी परिवारासोबत पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले आणि अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांची भेट घेऊन संपूर्ण माहिती दिली.

आशिष कांबळे यांनी तातडीने संवेदनशीलतेने या घटनेची दखल घेत पोलीस निरीक्षक किरणकुमार कुमार खेडकर (उपनगर पोलीस स्टेशन) यांच्याशी संपर्क साधून तत्काळ शोध मोहीम सुरू करण्याचे निर्देश दिले.

पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी कर्तव्यदक्षतेचा उत्तम आदर्श घालत केवळ १५ मिनिटांत मोबाइल लोकेशनच्या साहाय्याने शोध घेण्यास सुरुवात केली. त्यांच्या तांत्रिक पथकाने तपास करताना मोबाइल लोकेशन सुरतजवळील चलथान परिसरात असल्याचे निदर्शनास आले.

सुरत येथील पोलीस मित्रांच्या मदतीने किरणकुमार खेडकर यांनी संबंधित व्यक्तीशी संपर्क साधला व लगेचच व्हिडीओ कॉलद्वारे कुटुंबीयांशी संपर्क करून दिला. हा भावनिक क्षण अत्यंत हृदयस्पर्शी ठरला.

व्हिडीओ कॉलवर संजय पाटील यांच्याशी बोलतांना त्यांच्या परिवाराच्या डोळ्यांतून अश्रू अनावर झाले आणि त्यांनी पोलिसांच्या या संवेदनशील व तत्पर मदतीबद्दल मन:पूर्वक आभार मानले.

*कर्तव्यदक्ष अधिकारी आणि त्वरित कारवाई – एक आदर्श उदाहरण*

या प्रकरणात *अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे* आणि *उपनगर पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर* तसेच *हवालदार विकास पाटील* यांचे काम अत्यंत कौतुकास्पद असून त्यांनी फक्त पोलिसी कामगिरीच नव्हे, तर एक सामाजिक जबाबदारी बजावली आहे.

*अधिकारी असा असावा, जो फक्त नियम न पाहता माणुसकीही जपतो – याचे हे जिवंत उदाहरण आहे.*

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
5:01 pm, February 26, 2026
33°C
साफ आकाश
18 %
5 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 3%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!