नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

जुन्या वादातून एकास मारहाण करून गंभीर जखमी केले

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी – निवास गागडे

इचलकरंजी:- इचलकरंजी शहापूर येथे जुन्या वादातून एकास मारहाण करण्यात आली. मिळालेली सविस्तर माहिती अशी की. अजय संजय भोसले वय वर्ष 22 राहणार आसरा नगर गल्ली नंबर 10 याने दिलेल्या तक्रारीनुसार इचलकरंजी पोलीस ठाणे इचलकरंजी येथे दोघांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला.
दिलेल्या जबाब वरून दुपारच्या वेळेस अजय संजय भोसले व त्याचा मित्र पृथ्वीराज जाधव आणि राहुल होसमणी असे तिघेजण पाटील मळा ते शहापूर या रस्त्यावरून मोटरसायकल वरून जात असताना आरोपी रविकांत चंद्रकांत घोलकर वय 32 राहणार आसल नगर गल्ली नंबर 10 व अमोल उर्फ रवींद्र शिवाजी कामते वय 25 आसरा नगर गल्ली नंबर 9 या दोघांनी जुन्या वादातून पृथ्वी याला अश्लील शिवीगाळ करत जीवंत सोडणार नाही असे म्हणून आसरा नगर बस स्टॉप समोर रस्त्याच्या कडेला पडलेली दगडे घेऊन अजय व पृथ्वी यांना मारण्यास सुरुवात केली. पृथ्वीराज जाधव यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या डोक्यात व तोंडावर दगड घालून त्याला गंभीर जखमी केले. त्यावेळी जखमी पृथ्वीराज हा रस्त्यावर पडला. त्यावेळी फिर्यादी अजय भोसले याने सौरभ माने यांच्या मोटरसायकल वरून दवाखान्याला नेत असताना बिरदेव मंदिर पाटील मळा येथे सौरभ याची मोटरसायकल थांबवून याला जिवंत सोडणार नाही असे म्हणत परत गंभीर जखमी अवस्थेतील पृथ्वीराजला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. रविकांत घोलकर व अमोल कामत या दोघांच्या वर इचलकरंजी पोलीस ठाणे मध्ये 253/2025 भा. न्या. सं. कलम 109,118 (2), 115 (2), 352,3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. अमोल उर्फ रवींद्र शिवाजी कामते याच्यावर यापूर्वी इचलकरंजी पोलीस ठाणे , शहापूर पोलीस ठाणे येथे यापुर्वीही गुन्हे दाखल आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:30 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!