नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

खरेदी विक्री संघाच्या सभापतीपदी भाष्कर येंगळे यांची बिनविरोध निवड

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी :- अमर मोकाशी

भिवापूर :- तालुका खरेदी विक्री शेतकरी सहकारी संस्थेच्या आज पार पडलेल्या पदाधिकारी निवडणुकीत भाजपचे प्रभुत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून, भाजप समर्थित गटाचे ज्येष्ठ नेते भाष्कर येंगळे यांची सभापतीपदी तर अनिल ढोबळे यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा जल्लोष पाहायला मिळाला.
या आधी 1 जून रोजी पार पडलेल्या संचालक पदाच्या निवडणुकीत काँग्रेसचा संपूर्ण पराभव करत भाजप गटाने सर्व 17 जागा काबिज केल्या होत्या. त्यामुळे सभापती पदासाठी स्पर्धा चुरशीची ठरणार हे स्पष्ट होते.
सभापती पदासाठी भाष्कर येंगळे , अरविंद चौधरी आणि अनिल ढोबळे यांची नावे आघाडीवर होती. मात्र, अनुभवी आणि संघाच्या कामाचा दीर्घ अनुभव असल्यामुळे सर्वानुमते भाष्कर येंगळे यांच्यावर एकमुखी विश्वास व्यक्त करण्यात आला. त्यांनी यापूर्वी संस्थेचे प्रभारी सभापती व उपसभापती म्हणून जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
निवड प्रक्रियेदरम्यान काही निवडक मंडळींकडून विरोधाचे सूर उमटले असले तरी येंगळे समर्थकांनी वरिष्ठ पातळीवर आपली भूमिका ठामपणे मांडल्याने विरोध शमला आणि भाष्कर येंगळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.
या निवडणुकीत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आमदार राजू पारवे, सुधीर पारवे, तसेच जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत यांनी संयोजन आणि समन्वयाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडत निर्णायक भूमिका बजावली. या निवडीमुळे तालुक्यात भाजपचा शेतकरी संघटनांवरचा प्रभाव अधिक बळकट झाला असून, आगामी सहकारी संस्थांच्या राजकारणातही त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
9:49 am, April 20, 2026
33°C
टूटे हुए बादल
27 %
8 Km/h
Wind Gust: 9 Km/h
Clouds: 53%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!