नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

बेकायदेशीर गांजाची वाहतूक करणाऱ्या टोळीवर कारवाई; 12.66 लाखांचा मुद्देमाल जप्त – चार आरोपी ताब्यात

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ प्रतिनिधी:- प्रविण चव्हाण

नंदुरबार:- शहादा पोलीस ठाणे हद्दीतील असलोद ते मलगाव दरम्यान गांजाची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या आरोपींवर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मोठी कारवाई करत 12 लाख 66 हजार 780 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून चार आरोपींना ताब्यात घेतले आहे.

पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस व अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.

दिनांक 27 जून रोजी, असलोद ते मलगाव मार्गावर दुधखेडा गावाजवळ पोलीसांनी सापळा रचून तपासणी केली. त्या दरम्यान तीन मोटारसायकलवरून संशयास्पद हालचाली करणाऱ्या चार इसमांना थांबवून चौकशी केली असता त्यांच्या वाहनांमध्ये असलेल्या गोण्यांमध्ये सुमारे 53 किलो 330 ग्रॅम वजनाचा सुका गांजा सापडला.

ताब्यात घेतलेले आरोपी:
1. गुजाऱ्या मंसाराम पावरा (20), रा. सटीपाणी जामजिरा, शिरपूर
2. शिवदास विरसिंग पावरा (35), रा. गदडदेव, शिरपूर
3. गणेश विरसिंग पावरा (21), रा. गदडदेव, शिरपूर
4. नंदीलाल रोहिदास पावरा (19), रा. आंबाफाटा, शिरपूर

हस्तगत मुद्देमाल:

सुका गांजा – 53.330 किलो

तीन मोटारसायकल
एकूण किंमत – ₹12,66,780/-

या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात गु.र.नं. 381/2025 अन्वये
NDPS कायदा 1985 चे कलम 8(क), 20, 22 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी:
पोलीस निरीक्षक हेमंत पाटील (LCB), पोउपनि मुकेश पवार, पोउपनि छगन चव्हाण, पोहेका मुकेश तावडे, विशाल नागरे, बापू बागुल, पोना विकास कापुरे, पुरुषोत्तम सोनार, मोहन ढमढेरे, सचिन वसावे, पोशि अभय राजपुत, भरत उगले यांचा मोलाचा सहभाग होता.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
5:00 pm, February 26, 2026
33°C
साफ आकाश
18 %
5 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 3%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!