नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

कोल्हापूर पोलीस दलाकडुन गैरकृत्यांना आळा घालण्यासाठी हेल्पलाईन सुरू

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- संजय दिंडे

कोल्हापूर:- कोल्हापुर जिल्हयाचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी कोल्हापुर जिल्हयामध्ये घडणारे गैरकृत्ये,

बेकायदेशीर कृत्ये, अवैध व्यवसाय तसेच महिलांवर होणारे अन्याय व अत्याचार यांना प्रतिबंध करण्यासाठी जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सुचना दिलेल्या आहेत.
कोल्हापुर जिल्हयाचे पोलीस अधीक्षक योगेश गुप्ता यांच्या संकल्पनेतुन जिल्हयातील नागरीकांना आपले वास्तव्याचे परिसरामध्ये कोणतेही गैरकृत्य आढळुन आल्यास, बेकायदेशिर व्यवसाय सुरु असल्यास तसेच महिलांवर होणारे अन्याय व अत्याचार त्यामध्ये कौटुंबिक अत्यचार, कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक शोषण तसेच शाळा, कॉलेज, परिसरामध्ये मुलींची छेडछाड असे प्रकार आढळुन आल्यास त्याची माहिती पोलीसांना देणे नागरीकांना सुलभ व्हावे या करीता नव्याने
९८२२७६६१०० अशी
हेल्पलाईन सुरू केली आहे. सदरची हेल्पलाईन नागरीकांसाठी २४ तास सुरु असणार आहे. नागरीकांनी वास्तव्याचे परिसरामध्ये अथवा आजुबाजुचे परिसरामध्ये वरील कोणतेही गैरकृत्य आढळुन आल्यास त्याची माहिती तात्काळ हेल्पलाईन नंबरवर देणेत यावी. हेल्पलाईनवर माहिती देणा-या इसमाचे नाव गोपनीय ठेवले जाईल असे कोल्हापूर पोलीस दला तर्फे नागरीकांना आवाहन करणेत आले आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:40 am, April 20, 2026
37°C
कुछ बादल
20 %
3 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 24%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!