नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांची तडकाफडकी बदली

बाळासाहेब टेळे यांची भिवापूरला नियुक्ती; अवैध वाळू वाहतूक रोखण्याचे आव्हान

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨प्रतिनिधी:- अमर मोकाशी

भिवापूर :- भिवापूर तालुक्यात वाळू तस्करीप्रकरणी सतत चर्चेत असलेल्या तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांची आज तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती नागपूर ग्रामीण येथे करण्यात आली असून, त्यांच्या जागी बाळासाहेब टेळे यांची भिवापूर तालुक्याच्या तहसीलदारपदी नेमणूक झाली आहे.
डहाट यांनी एप्रिल 2023 मध्ये भिवापूरचा कार्यभार स्वीकारला होता. तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच झालेली ही अचानक बदली अनेक प्रश्न उपस्थित करत आहे.
भिवापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीवर अंकुश ठेवण्यात तहसील कार्यालय अपयशी ठरल्याचे आरोप वारंवार होत होते. विशेष म्हणजे, वाळूची वाहने पकडल्यानंतर कारवाई करताना तहसील कार्यालयाकडून पक्षपाती वागणूक दिली जात असल्याच्या तक्रारी देखील वरिष्ठ पातळीवर करण्यात आल्या होत्या. काही वाहनचालकांच्या म्हणण्यानुसार, काही प्रकरणांमध्ये दंड न आकारताच वाहने सोडली जात होती, तर काहींवर मुद्दामच कमी दंड आकारण्यात येत होता.
या गंभीर तक्रारी आणि कारवाईतील पक्षपातामुळेच डहाट यांची बदली करण्यात आली असावी, अशी जोरदार चर्चा आता तालुक्यात सुरू आहे. प्रशासनाकडून मात्र त्यांच्या बदलीचे अधिकृत कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही.
दरम्यान, टेळे यांच्यासमोर आता भिवापूरमधील वाळू तस्करी रोखण्याचे आणि कारवाईतील पारदर्शकता आणण्याचे मोठे आव्हान आहे. त्यांच्या कार्यपद्धतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:07 pm, February 26, 2026
31°C
साफ आकाश
23 %
12 Km/h
Wind Gust: 14 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!