नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

शिरूर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी : वृद्धेच्या गळ्यातील हिसकावलेले मंगळसूत्र परत

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨प्रतिनिधी:- सुजित मैड

संविदणे (ता. शिरूर) : परिसरात पायी चालणाऱ्या एका वृद्ध महिलेस जबरदस्तीने गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोरी करणाऱ्या दोघा आरोपींना शिरूर पोलिसांनी अटक केली असून, चोरी गेलेले सुमारे १ लाख १० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र पुन्हा महिलेला परत करण्यात आले आहे.

ही घटना दिनांक २७ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. संविदणे गावाजवळील मलठण – नारायणगाव अष्टविनायक हायवे रोडलगत एका कच्च्या रस्त्यावर फिर्यादी वस्त्सलाबाई दत्तात्रय सुके (वय ७७, रा. खडकवाडी, ता. आंबेगाव) या वृद्ध महिला चालत असताना, दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांचे गळ्यातील १.५ तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून मोटारसायकलवरून पलायन केले होते.

या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. २१५/२०२५ भादंवि कलम ३०९(४), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिपक करांडे, पोलीस हवालदार बापू मांगडे, पोलीस अंमलदार भाउसाहेब ठोसरे यांनी तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी १) अनिल सोमनाथ गव्हाणे व २) अनिल नारायण गव्हाणे (दोघे रा. गव्हाणेवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) यांना अटक केली. आरोपींकडून चोरी केलेले मंगळसूत्र हस्तगत करण्यात आले.

सदर मंगळसूत्र मा. न्यायालयाच्या आदेशानुसार दिनांक ३० जून २०२५ रोजी जेष्ठ नागरिक वस्त्सलाबाई सुके यांच्याकडे अधिकृतपणे सुपूर्त करण्यात आले.

ही संपूर्ण कारवाई मा. पोलीस अधीक्षक संदिप गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले आणि पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:34 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!