नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

गांजाची माहिती द्या; कारवाई करु:पोलिस अधीक्षक योगेशकुमार यांची माहिती

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ प्रतिनिधी:- प्रा. नागेंद्र जाधव

कोल्हापूर : गांजा, चरस, कोकेन, एमडी ड्रग्ज अशा अमली पदार्थाची विक्री रोखण्यासाठी पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेंतर्गत गांजा विक्रेत्यांना अटक करून पुरवठादारांचे नेटवर्क उद्ध्वस्त केले जाणार आहे. यासाठी नागरिकांनी त्यांच्या परिसरातील अमली पदार्थ विक्रेत्यांची माहिती हेल्पलाईनवरून द्यावी, असे आवाहन पोलिस अधीक्षकांनी केले आहे.
जिल्ह्यात अमली पदार्थांच्या सहज उपलब्धतेमुळे तरुणाई व्यसनांच्या आहारी जात आहे. यात महाविद्यालयीन मुलांचाही समावेश असल्याने यांचे गांभीर्य वाढले आहे. नशेखोरीतून गुन्हेगारी वाढण्याचा धोका ओळखून अमली पदार्थविरोधी विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला आहे. जिल्ह्यात गांजाची विक्री मोठ्या प्रमाणात होते. ती रोखण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यापूर्वी अटक केलेले विक्रेते, पुरवठादार पुन्हा सक्रिय होऊ नयेत, यासाठी ९८२२७६६१०० या हेल्पलाईनवर कॉल करून अवैध धंदे आणि अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात तक्रार नोंदवण्यासाठी कोल्हापूर पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी हेल्पलाईन नंबर जाहीर केला आहे. सद्या तरी या हेल्पलाईनला थंडा प्रतिसाद असून गेल्या सहा दिवसांत यावर केवळ १३ तक्रारी आल्या आहेत. यातील सात तक्रारी अवैध धंद्यांबद्दल होत्या, तर तीन तक्रारी कौटुंबिक हिंसेच्या होत्या.
उर्वरित तीन कॉल हेल्पलाईन सुरू आहे का ते बघण्यासाठी नागरिकांनी केले होते. हेल्पलाईनवर येणाऱ्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कारवाई केली जाणार आहे. गुन्हेगारी वाढण्याचा धोका ओळखून अमली पदार्थविरोधी विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला असून तक्रारदारांची नावे गोपनीय ठेवली जातील. त्यामुळे नागरिकांनी निर्भय होऊन तक्रारी करता येतील.

तसेच जिल्ह्याबाहेरून येणारा गांजा रोखण्यासाठी संशयितांची कसून तपासणी केली जाणार आहे. या मोहिमेत नागरिकांनीही सहभागी होऊन अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या संशयितांची नावे आणि ठिकाणे कळवावीत, असे आवाहन पोलिस अधीक्षकांनी केले आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:11 am, April 20, 2026
35°C
छितरे हुए बादल
23 %
11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 43%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!