नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

नाशिक शहराजवळील माडसांगवी येथे वकिलावर हल्ला करणाऱ्यास पोलिस कोठडी..

हल्लेखोरांचे वकीलपत्र नाकारले ,
न्यायालयाच्या द्वारावर वकिलांकडून निषेध,

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ प्रतिनिधी:- शांतारामभाऊ दुनबळे

नाशिक- : नाशिक शहराजवळील आडगाव पोलिस ठाण्या अंतर्गत माडसांगती येथे कार्यालयात
कामकाज करत असताना अॅड. रामेश्वर बोराडे (वय ३६, रा. शिलापूर) यांच्यावर तिघांनी चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना बुधवारी (दि.३) सायंकाळी घडली होती. संशयित आरोपी श्रुत नवनाथ कुलये (रा. देवळाली गाव) यास अटक करून गुरुवारी (दि.३) जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सोमवारपर्यंत (दि.७) त्यास पोलिस कोठडी सुनावली. तिघांनी अॅड बोराडे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झाल्यानंतरही बोराडे यांनी पोलिस येईपर्यंत रक्तबंबाळ अवस्थेत शस्त्रधारी कुलथे यास पकडून ठेवले होते. त्याचे दोन्ही साथीदार हे फरार झाले आहेत. जिल्हा न्यायालय प्रवेशद्वार क्र १-मध्ये मोठ्या संख्येने वकील एकत्र आल्याने दंगल नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले होते. यावेळी आरोपी कुलथे याचे वकीलपत्र कोणीही घेतले नाही. जिल्हा न्यायालय आवारात वकील रौद्ररूप पाहुन पोलिसांनी आरोपींस सात वाजता न्यायालयात हजर करण्याची तयारी केल्याचे समजताच प्रवेशद्वारावर वकिलांची गर्दी जमली. सायंकाळी साडेपाच वाजेपासून एक तास गर्दी कायम असल्यामुळे सात वाजता आरोपीला आणण्यात आले.

वकिलांमध्ये संतापाची लाट पसरली. हल्ल्याच्या निषेधार्थ वकिलांनी न्यायालयात एकत्र येत वकील संरक्षण कायदा मंजूर करण्यात यावा, अशी मागणी केली. न्यायाधीशांनी आरोपी केले यास नाव विचारून कोणाविषयी तक्रार आहे का? असे विचारले आणि पोलिसांना त्यास घेऊन जाण्याचे आदेश दिले. कुलथे याच्याविरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास आडगाव पोलिस करत आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
9:16 am, June 9, 2026
33°C
साफ आकाश
45 %
24 Km/h
Wind Gust: 26 Km/h
Clouds: 5%
Visibility: 10 km
Sunrise: 5:49 am
Sunset: 7:11 pm
Translate »
error: Content is protected !!