नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

जन ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्रतर्फे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन

कामठी रोड नारा एमआयडीसी परिसरात वृक्षारोपण; १००० झाडे लावण्याचा संकल्प

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨

नागपूर : जन ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्राच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कामठी रोडवरील नारा एमआयडीसी परिसरात पार पडलेल्या या उपक्रमात नागपूर ग्रामीणमधील पत्रकार व कंपनी मालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

या वेळी उपस्थित मान्यवरांनी वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचा संकल्प केला. पुढील वर्षभरात एकूण १००० झाडे लावण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

या कार्यक्रमात विदर्भ समन्वयक सुजितसिंग बाठ, जिल्हा उपाध्यक्ष अझहर पटेल, राही सामुद्रे, रणजीतसिंग बाठ, उज्ज्वल देवतळे, रिंकू पाजी, आदित्य पोटदुखे यांच्यासह युनियनचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वृक्षारोपणासारख्या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता वाढवण्याचा आणि सामाजिक भान निर्माण करण्याचा उद्देश असल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:34 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!