नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

सर्पदंशाने एकाचा मृत्यू

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨प्रतिनिधी:- तानाजी भोकरे

आजरा:- ता. ४ : लघु. शंकेसाठी घराबाहेरील अंगणात गेले असता सर्पदंश होऊन बाळकृष्ण गणपती दोरुगडे या सोहाळेवाडी येथील ४७ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला.

नेहमीप्रमाणे गुरुवारी रात्री ते जेवणानंतर झोपी गेले दरम्यान जाग आल्याने लघुशंकेसाठी मध्येच उठून ते दारात गेले असता तेथेच त्यांना सर्पदंश झाला.
नेमकी काय चावले हे लक्षात आले नसल्याने सकाळी दवाखान्यात दाखवू असा समज करून ते पुन्हा झोपी गेले. दरम्यान सकाळी त्यांचा मृतदेह आढळला.
त्यांच्या पश्चात विवाहित मुलगी, जावई, मुलगा पत्नी असा परिवार आहे.

कामावर हजर होण्यादिवशीच वडिलांचा मृत्यू …

त्यांच्या निरज या मुलाची केंद्रीय राखीव पोलीस दलात निवड झाली आहे. तो गुजरात येथे प्रशिक्षणासाठी हजर होण्यासाठी जात असतानाच सदर प्रकार घडला. एकीकडे मुलाच्या नोकरीचे स्वप्न साकार झाल्याने आनंदात असणारे दोरुगडे कुटुंबीय या घटनेने दुःखाच्या सागरात बुडाले आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:39 am, April 20, 2026
37°C
कुछ बादल
20 %
3 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 24%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!