लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई..
DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- संजय शेंडे
गडहिंग्लज:- अपघातातील वाहन सोडविण्यासाठी गडहिंग्लज पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक निता कांबळे यांनी चाळीस हजार रुपयेची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांच्यावर गडहिंग्लज पोलीस ठाणे मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार यातील तक्रारदार यांचे मुलाचे विरुद्ध गडहिंग्लज पोलीस ठाणे येथे अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्यामध्ये तक्रारदार यांचे वाहन जप्त करण्यात होते. वाहन सोडविण्यात आले होते. त्याच्या मोबदल्यात तसेच गुन्हयातील कलमे कमी करून, गुन्ह्याचे कागदपत्रे देण्याच्या मोबदल्यात 60,000 हजार लाच मागणी केली असलेची तक्रार तक्रारदार यांनी दिली होती. लोकसेवक आरोपी निता कांबळे यांनी तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष रुपये 60,000 हजार रुपये मागणी करून तडजोडी अंती 40,000 हजार रुपये लाच रक्कम पंचासमक्ष स्वीकारल्याने त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक निता कांबळे यांची अंगझडती मध्ये लाच रक्कम 40,000 हजार रुपये, व्हीओ कंपनीचा एक सोनेरी रंगाचा मोबाईल हॅन्डसेट मिळाले. घरझडती करीता गडहिंग्लज येथील के.डी.सी. बँक कॉलनी मध्ये पथक तात्काळ रवाना करण्यात आले असून घरझडती प्रक्रिया सुरू आहे. आरोपी विरुद्ध गडहिंग्लज पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधीक्षक वैष्णवी पाटील यांनी सांगितले. तपास अधिकारी पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप सापळा कारवाईत अधिकारी कर्मचारी पोलिस हवालदार संदीप काशिद, पोलिस हवालदार सुधीर पाटील पोलिस हवालदार संगिता गावडे, पोलिस हेड कॉन्स्टेबल कृष्णा पाटील, संदीप पोवार यांचा सहभाग होता.



