नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

पंढरपुरात सायरन अन् गाड्यांचा ताफा आषाढी एकादशी: पोलीस अन् प्रशासनावरील ताण वाढला. आषाढी एकादशीचा सोहळा पार पडला.

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨प्रतिनिधी:- पांडुरंग माने

पंढरपूर :- विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा रविवारी पहाटेच्या सुमारास माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते पार पडली. राज्याच्या मुख्यमंत्र्यां समवेत अन्य दिग्गज मंत्री सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले असल्याने मंत्र्यांच्या वाढलेल्या दौऱ्यामुळे पोलीस व जिल्हा प्रशासनावरील ताण वाढला होता. कार्यक्रम, बैठका, दर्शनाची सोय, सुरक्षेमुळे अधिकाऱ्यांची मोठी धावपळ झाली. आषाढी एकादशीच्या सोहळ्या निमित्त पंढरपुरात अनेक संतांच्या पालख्या दाखल झाल्या होत्या. वारकऱ्यांना देण्यात येत असलेल्या सेवा सुविधांची पाहणी, बैठका यासोबतच केलेल्या कामांचा आढावा मंत्री महोदयांनी घेतला. या वर्षी पंढरपुरात अंदाजे १५ ते २० लाख भाविक आले होते. त्यांच्या सेवा सुविधेसाठी पोलीस, महसूल, जिल्हा परिषद, आरोग्य विभागासह अन्य विभागांनी प्रयत्न केले. *पंढरपुरात आलेले मंत्री*
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, आपत्कालीन मंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास तथा पालकमंत्री जयकुमार गोरे,जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, मंत्री संजय सावकारे, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, कामगार मंत्री आकाश फुंडकर, गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर, राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डिकर
*एप्रिल पासून आतापर्यंत सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले १९७ मंत्री.*
*अधिकाऱ्यांची धावपळ*
प्रत्येक मंत्र्यांचा दौरा सुरळीत पार पाडावा, सुरक्षितता, बैठका, राहण्याची व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, यासह अन्य नियोजनाची जबाबदारी संपर्क अधिकाऱ्यावर होती. त्यामुळे दौरा यशस्वी करण्यासाठी संपर्क अधिकाऱ्यांची मोठी धावपळ झाली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:51 am, April 20, 2026
29°C
टूटे हुए बादल
31 %
13 Km/h
Wind Gust: 23 Km/h
Clouds: 74%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!