DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨प्रतिनिधी:- संदीप सकट
कोल्हापुर:- बेळगाव वेंगुर्ला रोडवरील कानूर खुर्द (चंदगड ) येथे शुक्रवारी दुपारी 3.30 च्या सुमारास टाटा मोटर्स HEXA MH09 एग 0555 बनावट नंबर प्लेट लावलेली पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये गोवा बनावटीच्या दारूच्या वेगवेगळ्या कंपनीच्या सिलबंद दारूच्या बाटल्या अवैध विक्री करण्याच्या हेतूने कानूर खुर्द येथून नेत असताना पोलिसांनी गाडी थांबविण्याचा इशारा केला असता त्यांना चुकवून भरधाव वेगाने गाडी चालवून बेळभाट हद्दीत रस्त्याच्या कडेला वाहन सोडून अज्ञात वाहन चालक यांनी पळ काढला. पोलिसांनी केलेल्या पाठलाग आणि धडक कारवाईत गोवा बनावटीच्या वेगवेगळ्या किमतीच्या 3,66,300₹ चा मुद्देमाल जप्त केला आहे. अज्ञाताविरुद्ध गु. र. 209/2025,BNS कलम 318/4,336/2,3/5,सह महाराष्ट्र दारूबंदी कायदा क 65अ, ई, 90,108,83,मोटार वाहन कायदा कलम 239/177,184प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस हवालदार अंबुलकर सह पोलीस निरीक्षक तपास करीत आहेत.



