गांधीनगर पोलीस ठाणेकडील खुनाच्या गुन्हयातील 04 आरोपी व 03 विधीसंघर्षग्रस्त बालक असे 07 जणांना 2 तासात घेतले ताब्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची कारवाई
DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- नारायण कांबळे

कोल्हापुर:- कोल्हापुर जिल्हयातील गांधीनगर पोलीस ठाणे हददीमध्ये दिनांक 06.07.2025 रोजी कोयना कॉलनी येथे एक इसम मयत झाल्याने गांधीनगर पोलीस ठाणेस अकस्मात मयत रजिस्टर नं. 52/2025 बी एन एस एस 194 प्रमाणे मयत दाखल करण्यात आले होते. सदर मयताचे शवविच्छेदनामध्ये वैदयकीय अधिकारी यांनी डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने मयत झाले असलेबाबत सांगितले होते. त्यानंतर मयताचे नातेवाईक वडील सुनिल आवळे यांनी त्यांचा मुलगा आशुतोष सुनिल आवळे याचे प्रेत पाहुन व प्रेताचे डोक्यास झालेली गंभीर दुखापत पाहुन, गांधीनगर पोलीस ठाणेस हजर राहुन मुलास अज्ञात इसमांनी जीवे ठार मारले असलेबाबत फिर्याद दिल्याने गांधीनगर पोलीस ठाणे गुरनं. 320/2025 भा. न्या. स. कलम 103(1) प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची बाब ही गंभीर स्वरुपाची असलेने कोल्हापूर जिल्हयाचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मयत इसमाचे अज्ञात मारेक-यांचा शोध घेणेकामी योग्य त्या सुचना देवून मार्गदर्शन केले.
मा. पोलीस अधीक्षक यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांचेसह एकूण 4 तपास पथके तयार करून सदर मयत प्रकरणाचा समांतर तपास चालू केला. पथकांनी दिलेल्या सुचनाप्रमाणे सदर घटना घडलेल्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले परंतु सदर मयताबाबत काहीएक माहिती मिळुन आली नाही.
सदर मयताचा तपास सुरु असताना स्थनिक गुन्हे शाखेचे पोलीस अमंलदार वैभव पाटील यांना त्याचे गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मयत नामे आशुतोष सुनिल आवळे याचा काही इसमांनी खुन करुन त्यास जीवे ठार मारले आहे व ते सर्व इसम पळुन जाणेच्या तयारीत आहेत. अशी माहिती मिळालेनंतर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांचे पथकाने गांधीनगर कोयना कॉलणी परिसरातुन करण महेश डांगे वय 19 या इसमास संशयावरुन ताब्यात घेतले व त्याचेकडे गांधीनगर पोलीस ठाणेस दाखल असलेल्या खुनाच्या गुन्हयातील मयत नामे आशुतोष सुनिल आवळे याचे बाबत विचारणा केली असता प्रथम त्याने उडवाउडवीची उत्तरे देवुन पोलीसाची दिशाभुल करण्याचा प्रयत्न करु लागला परंतु पोलीसांनी त्यास अधिक विश्वासात घेवुन विचारणा केली असता त्याने मित्र शंकर बापु बनसोडे, राजु सचिन काळोखे, शुभम संजय कांबळे व 3 बालक असे 7 जणांनी दिनांक 05.07.2025 रोजी रात्री 11.00 वा रोजी कोयना कॉलणी येथील माळावरील बाकडयावर मोबाईलमध्ये गेम खेळत असताना मयत आशुतोष आवळे हा आला होता, त्यास करण डांगे याने मित्रा तु इथे काय करत आहेस असे विचारले असता त्याने करण डांगे यास आई व बहिणीवरुन वाईटवंगाळ शिवीगाळ केली. त्याचेकडील एडका हे हत्यार दाखवुन मारहाण करु लागला. बाकीचे मित्रांनी त्यास अडविण्याचा प्रयत्न केला परंतु आशुतोष हा दारुच्या नशेत असलयाने तो काही एकण्याच्या मनस्थितीत नव्हता तो अतिशय घाणेरडया भाषेत सर्वांना शिवीगाळ करीत असलेने करण व त्याचे मित्रांनी दगड व लाकडी बॅटने त्यास मारहाण केली त्यामध्ये तो मयत झाला, तो मयत झाला आहे याची खात्री झालेनंतर सर्वांनी मिळुन त्यास शांतीप्रकाश घाट पंचगंगा नदी गांधीनगर येथे नदीकाठावर फेकुन दिले होते अशी हकीकत सांगुन गुन्हा केलेची कबुली दिली आहे.
त्यानंतर करण डांगे याचे माहितीने इतर सर्व आरोपीचा शोध सुरु केला त्यामध्ये शंकर बापु बनसोडे व राजु सचिन काळोखे हे दोघेजण तावडे हॉटेल येथुन कराड येथे पळुन जाणेच्या तयारीत असताना त्यांना ताब्यात घेतले व त्यानंतर शुभम संजय कांबळे व इतर सर्वांना गांधीनगर परिसर व कावळा नाका, एस स्टी स्टड परिसरातुन ताब्यात घेतले, त्यांचेकडे गांधीनगर कोयना कॉलणी मध्ये घडलेल्या खुनाच्या अनुषंगाने सखोल चौकशी केली असता त्यांनी आपण सर्वांनी आशुतोष आवळे याने शिवीगाळ केलेने त्याचा खुन करुन त्याचे प्रेत शांतीप्रकाश घाट पंचगंगा नदी गांधीनगर परिसरात फेकुन दिलेचे सांगीतलेने आरोपी नामे 1) शंकर बापु बनसोडे वय 19, 2) राजु सचिन काळोखे वय 20, 3) शुभम संजय कांबळे वय 19, 4) करण महेश डांगे वय 18, वरील चार आरोपी व तीन विधीसंघर्षग्रस्त बालकांना पुढील चौकशी कामी ताब्यात घेवुन गांधीनगर पोलीस ठाणेस हजर केले आहे, पुढील तपास गांधीनगर पोलीस ठाणेकरवी सुरु आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक योगेश कुमार, मा. अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, पोलीस अंमलदार वैभव पाटील, गजानन गुरव, योगेश गोसावी प्रदीप पाटील, राजु कांबळे, शिवानंद मठपती, विशाल खराडे, संतोष बरगे, अमित मर्दाने, अरविंद पाटील यांनी केली आहे.



