DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨प्रतिनिधी:- संजय दिंडे
कोल्हापूर:- मुंबई पोलीस असल्याचे भासवून कोल्हापूरतील वयोवृद्ध महीलेस तिन कोटी सत्तावन लाख तेविस हजार रूपये लुटले.
याबाबत पोलिस ठाण्यातुन मिळालेली माहिती अशी की
कोल्हापूर शहरातील मिना डोगरे वय वर्षे ७५ .डोंगरेज अपार्टमेंट सरनाईक मळा या वयोवृद्ध महीलेस तीन अनोळखी इसम यांनी त्यांच्या बँक खात्याची माहिती घेवुन इच्छेविरुध्द पैसे पाठविणेस भाग पाडुन फसवणुक केली असल्याची फिर्यादी मिना मुरलीधर डोगरे यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात दिली. मिना डोगरे यांचे मोबाईल नंबर 7391970817 वर मोबाईल नंबर 989805427 वरुन अनोळखी आरोपीने फोन करुन व वेगवेगळ्या मोबाईल नंबरचे व्हॉटसअॅप वरुन कॉल करुन फिर्यादीस” तुमचा फोन दोन तासामध्ये बंद होणार आहे असे सांगत ” फिर्यादीने त्याबाबत विचारले असता अनोळखी आरोपीने ” आम्ही ट्राय डिपार्टमेन्ट मधुन बोलत आहे, कुलाबा पोलीस ठाणे माहीम येथे फिर्यादी यांचे नावे 2 जानेवारी 2025 रोजी तक्रार नोंद असुन त्याचा नंबर MH56210225 असा आहे. नरेश गोयल मनी लॅन्डींग अॅण्ड इन्व्हेस्टमेंट फ्रॉड केस मध्ये फिर्यादी यांचे आधार कार्ड आधारे कॅनरा बँक शाखा माहिम मध्ये 6 करोड जमा झाले असलेचे खोटे सांगुन फिर्यादीस व्हॉटसअॅप व्हिडीओ कॉलवर अनोळखी आरोपीनी मुंबई पोलीस असलेचे भासवुन फिर्यादी कडुन बँक खात्याची माहिती घेवुन बँक खाते क्रमांक सांगुन त्यावर रक्कम जमा करणेस सांगितले .फिर्यादीने नकार दिला असता अनोळखी आरोपीने आम्ही तुमच्या घरी पोलीस घेवुन येवुन अटक करुन सोशल मिडियावर बातमी प्रसारीत करण्याची धमकी देवुन फिर्यादीचे इच्छेविरुध्द वेगवेगळ्या बँक खात्यावरुन एकुण 3,57,23,000 हजार रुपये आर.टी.जी.एस व एन.ई.एफ.टी व्दारे अनोळखी आरोपीनी सांगितले प्रमाणे वेगवेगळ्या खात्यावर पाठविणेस भाग पाडुन फिर्यादी यांची फसवणुक केली असल्याचे फिर्याद फिर्यादी समक्ष पोलीस ठाणेत येवुन दिलेने राजारामपुरी पोलिस ठाण्याचे पोलीस निरिक्षक सुशांत चव्हाण यांनी आरोपींच्यावर 378/2025. बी.एन.एस.2023 चे कलम 316[2],318[4],351 [2], 3 [5] प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.



