नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

डॉ. सरोजिनी नायडू विद्यामंदिर शाळा क्र. ४३, शहापूर येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- नारायण कांबळेकोल्हापूर — इचलकरंजी ( ता, हातकणंगले ) शहापूर डॉ. सरोजिनी नायडू विद्यामंदिर शाळा क्रमांक ४३, शहापूर येथे

गुरवार दिनांक १० जुलै २०२५ रोजी गुरुपौर्णिमा सोहळा अत्यंत भक्तिभाव, उत्साह आणि कृतज्ञतेच्या भावनेत पार पडला. गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुंच्या ऋणाची जाणीव करून देणारा दिवस. शाळेतील विद्यार्थ्यांनी या दिवशी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करून आपल्या गुरुजनांप्रती आदर व्यक्त केला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदरणीय मा. श्री. आत्माराम गायकवाड सर होते. प्रमुख उपस्थिती शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ. सुनंदा मल्लाडे मॅडम यांची होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. रुपाली पवार मॅडम यांनी ओघवत्या शैलीत केले.कार्यक्रमाची सुरुवात मंगल वंदनेने झाली. नंतर विद्यार्थ्यांनी “गुरूर्ब्रह्मा गुरूर्विष्णुः…” या श्लोकाने कार्यक्रमाचा अध्यात्मिक माहोल निर्माण केला. विविध विद्यार्थ्यांनी आपली मनोगते मांडत गुरूंच्या योगदानाचे महत्त्व सांगितले व आपले विचार प्रभावीपणे सादर केले.या कार्यक्रमात विशेष भर घालणारा भाग म्हणजे बालवाडीतील बालचमुंचा सहभाग. बालवाडीतील विद्यार्थ्यांनी देखील मा. सौ. पुनम देसाई मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय छान पद्धतीने गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम सादर केला. त्यांच्या निरागस भावनांनी उपस्थितांच्या हृदयाला स्पर्श केला. लहानग्यांनी सुद्धा आपल्या शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करत सुंदर मनोगते सादर केली.विद्यार्थी प्रतिनिधींनी संपूर्ण शाळेतील सर्व शिक्षकवृंदांना गुलाब पुष्प देऊन आणि त्यांचे पदपूजन करून आपल्या कृतज्ञतेची भावनात्मक अभिव्यक्ती केली. हा प्रसंग अत्यंत भावनिक व प्रेरणादायक ठरला.
प्र.मुख्याध्यापिका मल्लाडे मॅडम यांनी आपल्या मनोगतातून शिक्षकांचे कार्य म्हणजे समाज घडवणारा खरा शिल्पकार असल्याचे अधोरेखित केले. कार्यक्रमात शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सहभागाचे कौतुक करत त्यांच्या आत्मविश्वासाचे कौतुक केले.कार्यक्रमाची सांगता ‘गुरुर्ब्रह्मा’ या सामूहिक स्तोत्र पठणाने करण्यात आली. विद्यार्थ्यांना गोड खाऊ वाटप करून कार्यक्रमाचा समारोप झाला.गुरुपौर्णिमा सोहळा विद्यार्थ्यांमध्ये गुरुंसाठी प्रेम, आदर, अनुशासन आणि कृतज्ञतेची भावना वृद्धिंगत करणारा ठरला. या कार्यक्रमामुळे शाळेत अध्यात्म, संस्कार आणि संस्कृती यांचा संगम अनुभवायला मिळाला.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
9:41 pm, February 26, 2026
28°C
साफ आकाश
35 %
25 Km/h
Wind Gust: 35 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!