नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

बेळगाव येथील सुवर्ण कारागिराची कुटुंबासह आत्महत्या:सोन्याच्या भिशीतून नुकसान कारणीभूत.

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 सीमाभाग प्रतिनिधी:- विलास शिंदोळकर

बेळगावमध्ये बुधवारी एकाच कुटुंबातील चौघा जणांनी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यापैकी तिघा जणांचा मृत्यू झाला असून आणखी एक जण अत्यवस्थ आहे. बुधवारी सकाळी जोशी मळा, खासबाग येथे ही घटना घडली. एका सुवर्ण कारागिराच्या कुटुंबातील तिघा जणांच्या आत्महत्येने शहरात एकच खळबळ माजली आहे.यासंबंधी वडगाव येथील एका दाम्पत्यावर शहापूर पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
संतोष गणपती कुर्डेकर (वय ४७), त्याची बहीण सुवर्णा गणपती कुर्डेकर (वय ५२), आई मंगल गणपती कुर्डेकर (वय ८५) या तिघा जणांचा विष प्राशनानंतर काही क्षणातच मृत्यू झाला आहे. तर संतोषची आणखी एक बहीण सुनंदा गणपती कुर्डेकर (वय ५०) हिनेही विष घेतले असून तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.आत्महत्या करण्यापूर्वी संतोषने एक मृत्युपत्र लिहून आपल्या खिशात ठेवले होते. या पत्रात आपण व आपल्या कुटुंबीयांवर ही वेळ का आली, याची माहिती दिली असून वडगाव येथील राजेश कुडतरकर व त्याच्या पत्नीच्या नावाचा उल्लेख केल्यामुळे या दाम्पत्यावर भारतीय न्याय संहिता कलम १०८ अन्वये एफआयआर दाखल केला आहे. दुर्दैवी संतोष हा सुवर्ण कारागीर होता. आई व बहिणींबरोबर जोशी मळा, खासबाग येथे त्याचे वास्तव्य होते. बुधवार दि. ९ जुलै रोजी सकाळी संतोषची बहीण सुनंदा ही आपल्या घरातून आरडाओरड करीत बाहेर आली. त्यावेळी शेजारी त्यांच्या घराकडे धावले. घरात संतोष, त्याची आई व बहिणींचे मृतदेह पडले होते. तर सुनंदाची प्रकृतीही खालावली होती. या प्रकारानंतर तातडीने सुनंदाला सिव्हिल हॉस्पिटलला हलवून शहापूर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.
पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे, उपायुक्त रोहन जगदीश, मार्केटचे एसीपी संतोष सत्यनायक, शहापूरचे पोलीस निरीक्षक एस. एस. सीमानी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. संतोषच्या खिशातील मृत्युपत्र (सुसाईड नोट )ताब्यात घेऊन या प्रकरणाचा तपास हाती घेण्यात आला आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
9:40 pm, February 26, 2026
28°C
साफ आकाश
35 %
25 Km/h
Wind Gust: 35 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!