DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:-

प्रा. नागेंद्र जाधव
बेळगांव वेंगुर्ला रस्त्यावरील कुद्रेमनी पाट्यावर गाडीवरून पडल्यानंतर डंपरने फरफटत नेल्याने गंभीर जखमी झालेल्या मांडेदुर्ग येथील विवाहितेची मृत्यूशी चालेली तब्बल झुंज वीस दिवसांनंतर संपली. बेळगाव येथील रुग्णालयात गुरुवारी सकाळी ९ वाजता त्यांचे निधन झाले. बेळगाव-वेंगुर्ले मार्गावर कुद्रेमनी फाट्यानजीक २१ जूनला त्यांचा अपघात झाला होता. शिवांजली विशाल शहापूरकर (वय ३८) असे मृत महिलेचे नाव आहे.अधिक माहिती अशी, २१ जूनला शिवांजली पतीसह दुचाकीवरून बेळगावहून आपल्या गावी मांडेदुर्गकडे येत होत्या. कुद्रेमनी फाट्याजवळ त्यांची दुचाकी आली असता दुचाकीवरून त्या खाली पडल्या. त्याचवेळी मागून येणाऱ्या डंपरने त्यांना पन्नास फूट फरपटत नेले होते. त्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर बेळगावमध्ये खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. २० दिवस त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. अखेर गुरुवारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, सासू, सासरे, दीर असा परिवार आहे. त्यांचे पती सैन्यदलात आहेत.
बेळगाव-वेंगुर्ले मार्गावर खड्डेच खड्डे पडले असून, याकडे चंदगड PWD अधिका-यांनी दुर्लक्ष केले आहे. त्या खड्यांमुळे शिवांजली यांना जीवाला मुकावे लागल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. तसेच संबंधित अकार्यक्षम, बेजबाबदार अधिकाऱ्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा यावा अशी मागणीही होत आहे.
दोन दिवसापूर्वी याचं मार्गावरील कानूर बुद्रुक येथे खड्डा चुकविताना एक कार शेतात गेली होती. मात्र, सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नव्हती. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष न दिल्यास, संबंधित बेजबाबदार अधिकाऱ्यांनी यावर तात्काळ उपाययोजना न केल्यास आणि चंदगडचे लोकप्रतिनिधी यांनी यात लक्ष न घातल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा धामापूरचे सरपंच संतोष मोरे, सामाजिक कार्यकर्ते नितीन फाटक व संघर्ष प्रज्ञावंत यांनी दिला आहे.चंदगड मधील संबंधित PWD खात्यातील बेजबाबदार अधिकारी अजून किती नागरिकांचा बळी घेणार असा संतप्त सवाल चंदगडवाशीय करीत आहेत.



