नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

वाहतुकीचे नियम पाळा अन्यथा कारवाईला सामोरे जा:- पो.नि. दिपक वळवी

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- अकिल शहा


साक्री: महाराष्ट्रातील भौगोलिक दृष्ट्या क्षेत्रफळाने मोठ्या असलेल्या साक्री तालुक्यातील वाहनधारकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत या मुख्य उद्देशाने साक्री शहरामध्ये दि.११ जुलै शुक्रवारी रोजी साक्री पोलीसांच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियानाला( ट्रॅफिक अवेअरनेस सप्ताह) सुरूवात करण्यात आली. हे अभियान आठवडाभर राबविण्यात येणार आहे अभियानाच्या पहिल्याच दिवशी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी (गोल्डी पॉइंट, बस स्टँड रोड, बाजार पेठ अशा ठिकाणी जावून वाहतुकीला अडथळा निर्माण करू नका, वाहन चालकांनी ड्रायव्हिंग लायसन्स व कागदपत्रे सोबत बाळगा अशा सूचना देण्यात आल्या व तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. दिवसभरात ३५ मोटर सायकली, २ ट्रॅक्टर, १२ चारचाकी वाहने असे एकूण ४९ वाहनांची तपासणी करण्यात आली यापैकी १५ वाहनांवर दंडात्मक कारवाई करीत ११,००० रू. चा दंड ही वसूल करण्यात आला, या मोहिमेचा उद्देश सामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड देणे असा नसून वाहनधारकांनी वाहतुकीचे नियम पाळावे असा हेतू आहे अशी माहिती साक्री पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिपक वळवी यांनी प्रसार माध्यमांना दिली.

या रस्ता सुरक्षा अभियानाला सुरूवात शुक्रवार रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास साक्री पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिपक वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अनिल बागुल, सपोनि विकास शेवाळे, पोसई प्रसाद रौंदळ, पोसई महेश घायतळ, असई बापू रायते, पोहेकॉ संजय शिरसाठ, पोहेकॉ शांतीलाल पाटील, वाहतूक विभागाचे पोशि प्रमोद पांचाळ, पोहेकॉ. आनंद चव्हाण, पोशि. साईनाथ पवार, पोशि. सागर चौधरी, पोशि. मंगेश खैरनार, पोशि. योगेश पिसे, पोशि. राजमल अहिरे अशांच्या पथकाने केली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
9:45 pm, February 26, 2026
28°C
साफ आकाश
35 %
25 Km/h
Wind Gust: 35 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!