नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

उचगाव अनाधिकृत उत्खनन तहसीलदारांची दंड वसुलीची कारवाई – सामाजिक कार्यकर्ते राजेंश कांबळे

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ प्रतिनिधी:- आनंद कांबळे

कोल्हापूर:- अनाधिकृत उत्खनन केले प्रकरणी उचगाव येथिल शाम दर्यानी व राम दर्यानी यांच्या कडून १.३२.६८८ रूपये दंड वसूलची कारवाई करण्यात आली . विनापरवानगी अनाधिकृत उत्खनन केले प्रकरणी कोल्हापूर येथील सामाजिक कार्यकर्ते राजेश कांबळे यांनी करवीर तहसीलदार यांना तक्रार दिली होती. तहसीलदार यांनी तक्रारीच्या अनुषंगाने तलाठी यांना चौकशी करण्यासाठी कळविले होते. तलाठी यांनी मौजे उचगांव तालुका करवीर येथील गट नं. १७३/३/१ मध्ये विनापरवाना मुरूम गौणखनिजाचे २३.२ ब्रास अनधिकृत उत्खनन केले असलेचे दिसून येत आहे असा अहवाल तहसीलदार यांना पाठविले. करवीर तहसीलदार कार्यालयाकडून शाम रमेशलाल दर्यानी व राम रमेशलाल दर्यानी, उचगांव यांना नोटीस देवून ७ दिवसाचे आत या कार्यालयास खुलासा सादर करणेबाबत कळविले होते. मिळकतदार यांनी तहसीलदार यांच्या नोटीस बाबत योग्य असा खुलासा विहीत मुदतीत या कार्यालयास सादर केलेला नसलेने शाम रमेशलाल दर्याणी व राम रमेशलाल दर्याणी रा.उचगांव यांच्या गट नं 173/1/अ मध्ये 23.2 ब्रास इतके अनधिकृत उत्खनन केलेने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 48 पोटकलम 7, 4 ,8 (1) (2) व शासन परिपत्रक क्र.गौन/10/03/2016/प्र.क्र 209, रि 14/06/2017 तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र (असाधारण भाग दिनांक 12/01/2018 मधील तरतूदीनुसार रक्कम रुपये 1,32,688/- (अक्षरी-एक लाख बत्तीस हजार सहाशे अठयाऐंशी रु) इतका दंडाचा आदेश पारित करणेत आला. 15 दिवसांत दंडाची रक्कम न भरलेस महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 182 (1) (2) (3) मधील तरतु‌दीनुसार कुटुंबाचे नावे असलेल्या स्थावर मिळकत सरकार जमा करणेची कार्यवाही करणेत येईल अशी नोटीस देण्यात आली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:39 pm, February 26, 2026
32°C
साफ आकाश
21 %
8 Km/h
Wind Gust: 9 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!