नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

सि.गो. पाटील महाविद्यालयात करिअर संसद शपथविधी सोहळा संपन्न.

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️🚨 दर्शन पोलीस टाइम 🚨 प्रतिनिधी:- अकिल शहा

साक्री: प्रत्येक विद्यार्थ्याला स्वयंपूर्ण व रोजगारक्षम करण्यासाठी कौशल्यपूर्ण शिक्षण देणे गरजेचे असून करिअर कट्ट्याच्या माध्यमातून युवा कौशल्यक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत असे मत महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राचे अध्यक्ष श्री यशवंत शितोळे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या द्वारा विद्या विकास मंडळाचे सिताराम गोविंद पाटील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथे जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त करिअर संसद शपथविधी सोहळा साठी आयोजित ऑनलाइन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र अहिरे, उपप्राचार्य डॉ. अनंत पाटील, करियर कट्ट्याचे महाविद्यालयीन समन्वयक डॉ. धनंजय पाटील, डॉ. अनुप मोरे उपस्थित होते.
यशवंत शितोळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भारताची ओळख जगाला कौशल्यपूर्ण मानव पुरविणारा देश म्हणून व्हावी, तशा अर्थाने करिअर कट्ट्या अंतर्गत प्रयत्न केले जात असल्याचे मत प्रसंगी व्यक्त केले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. राजेंद्र अहिरे यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना औपचारिक शिक्षणा व्यतिरिक्त सर्वांगीण व्यक्तिगत विकासा संदर्भात माहिती व ज्ञान अवगत करण्यासाठी करिअर कट्टा महत्वपूर्ण भूमिका निभावत असल्याचे मत व्यक्त केले.सदर कार्यक्रमात जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त करियर संसद शपथविधी सोहळा संपन्न झाला.
करियर संसद निवडणुकीची प्रक्रिया मागील महिन्यात संपन्न झाली असून त्यात विविध विद्यार्थ्यांनी आपला निवडणूक उमेदवार अर्ज भरला. प्रचार व निवडून प्रक्रिया संपन्न होऊन निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांचा आज शपथविधी संपन्न झाला. यात ठाकरे रिया मुख्यमंत्री,भामरे विशाखा नियोजन मंत्री, गांगुर्डे मानसी कायदे व शिस्तपालन मंत्री, माळी वेदश्री सामान्य प्रशासन मंत्री, पाटील प्रवीण माहिती व प्रसारण मंत्री, बोरसे जयेश उद्योजकता विकास मंत्री, बेडसे कुणाल रोजगार स्वयंरोजगार मंत्री, सोनवणे प्रतीक्षा कौशल्य विकास मंत्री, बोरसे मीनाक्षी संसदीय कामकाज मंत्री, साळुंके तेजस्विनी महिला व बालकल्याण मंत्री तर पगारे साक्षी हिने सदस्य म्हणून शपथ घेतली. सर्व मंत्र्यांना करिअर कट्ट्याकडून नियुक्तीपत्र, प्रमाणपत्र व कीट देण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनंजय पाटील यांनी तर आभार डॉ. अनुप मोरे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. चंद्रकांत कढरे, प्रशांत बोरसे यांनी परिश्रम घेतले.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:11 am, April 20, 2026
35°C
छितरे हुए बादल
23 %
11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 43%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!