
DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाइम 🚨 प्रतिनिधी:- अजगरभाई मुल्ला
जळगाव :- राज्यात प्रतिबंधित पदार्थ गुटख्याची चोरटी वाहतुक करणाऱ्या इसमास चाळीसगांव शहर पोलीसांनी मालासह जेरबंद केले. दिनांक- १६/०७/२०२५ रोजी पहाटे ६/३० वाजेच्या सुमारास नागद गावाकडुन चाळीसगावं शहरात गुटखा ने भरलेली महिंद्रा कंपनीची बोलेरो मालवाहु गाडी चाळीसगांव शहरात येत असल्याबाबत पोलीस निरीक्षक अमीतकुमार मनेळ यांना खात्रीशिर बातमी मिळाली असता चाळीसगावं शहर पोलीस स्टेशनचे पोउनि / संदीप घुले पोलीस अंमलदार आशुतोष सोनवणे, रविद्र बच्छे, समाधान पाटील चाळीसगांव शहर पोलीस स्टेशन यांना मिळालेल्या सदर बातमीच्या अनुशंगाने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी वाहनाबाबत सखोल व गोपनीयरित्या माहीती संकलीत करुन वाहन क्रमांक MH-४१-AU-३२१० हीस चाळीसगांव शहरात हीरापुर रोड नवजीवन सुपर शॉपी समोर सदर वाहन रस्त्यावर थाबवुन खात्री केली असता वाहनात गुटख्याने भरलेल्या गोण्या मिळून आल्या.
त्यानंतर अन्न् व औषध प्रशासन विभागातील अधिकारी यांना बोलावुन मिळुन आलेल्या गुटखा या मालाचा सविस्तर पंचनामा केला असता वाहनात ७,१९,०२९ रु कीमतीचा गुटखा व वाहन कीमत ८,००,०००/- रु की महेद्रा कंपनीची बुलेरो माल वाहु गाडी वाहन क्रमांक MH-४१-AU-३२१० असा एकुन १५,२९,०२९ असा मुदेमाल मिळुन आला वाहनाचा चालक व त्याच्या सोबत असलेला इसम अरबाज इब्राहीम पठाण रा. सार्वे ता. पाचोरा व गुटखा मालाचा मालक दिपक वेदमुथा रा. नागद जि. संभाजी नगर यांच्या विरोधात प्रचलीत कायदयान्वये शरद मधुकर पगार (अन् सुरक्षा अधिकारी, जळगांव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरुन गुरनं. ३०६/२०२५ भा. न्या. सं. (BNS) कलम- १२३,२२३,२७४, २७५, अन्न सुरक्षा कायदा अधी २००६ चे कलम २६ (२) आय (1) २६ (२) १,२७ (१), (३), (D), (E), वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास वरीष्ठांच्या आदेशान्वये पोउनि/संदीप घुले व पोहेकॉ राकेश पाटील हे करीत आहे.
सदरची कारवाई मा. महेश्वर रेड्डी सो, पोलीस अधिक्षक जळगाव, मा. कविता नेरकर (पवार), अप्पर पोलीस अधिक्षक सो. चाळीसगाव, मा. विनायक कोते सो. उपविभागीय पोलीस अधिक्षक चाळीसगाव भाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमीतकुमार मनेळ यांच्या नेतृत्वाखाली पोउपनिरी/संदीप घुले, पोलीस अमंलदार राहुल सोनवणे, योगेश बेलदार, आशुतोष सोनवणे, रव्रिद बच्छे, समाधान पाटील तसेच गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांनी केली आहे.



