DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी:-विलास शिंदोळकर
कर्नाटक :- नशामुक्त बेळगाव उद्दिष्टपूर्ती साध्य करण्यासाठी बेळगाव शहर व उपनगरात सुरू असलेल्या अवैध मटका व जुगार अड्ड्यावरील पोलिसांची कारवाई तीव्र झाली असून अवैध मटका बंद करण्यासाठी एका मटका बुकीला तडीपार करण्यात आले आहे.न्यू गांधीनगर येथील एका बुक्कीला सहा महिन्यासाठी तडीपार करण्यात आले आहे पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त व विशेष कार्यकारी दंडाधिकारी रोहन जगदीश यांनी गुरुवारी १० जुलै रोजी तडीपाराचा आदेश बजावला आहे. या कारवाईने मटका व जुगारी अड्डा चालकांचे धाबे दणाणले आहेत.
जावेद मोहम्मद शेख वय वर्ष 50 राहणार नुराणी गल्ली न्यू गांधीनगर बेळगाव असे त्यांचे नाव आहे. माळ मारुतीचे पोलीस निरीक्षक जे एम कालीमिर्ची, उपनिरीक्षक होन्नप्पा तळवार व हवालदार के. बी. गवराणी आदीनी या संबंधीचा प्रस्ताव तयार करून मार्केटचे एसीपी संतोष सतनाईक यांची मंजुरी घेऊन पोलीस आयुक्त कार्यालयाला पाठविला आहे. गुरुवारी विशेष दंडाधिकारी असणाऱ्या पोलीस उपायुक्त यांनी या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करून जावेदला सहा महिन्यासाठी उडपी जिल्ह्यातील कुंदापूर पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात तडीपार करण्यात आले आहे सदर आरोपीवर माळमारुती, मार्केट, शहापूर पोलिस स्थानकात एकूण आठ गुन्हे नोंद आहेत यापैकी पाच प्रकरणात त्याला दंडाची शिक्षा झाली आहे तर एका प्रकरणात त्यांची सुटका झाली असून आणखीन दोन प्रकरणाची चौकशी सुरू आहे. या कारवाईमुळे महिला वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे व परिसरात सर्वत्र पोलिसांचे अभिनंदन होत आहे.



