DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨प्रतिनिधी:- राजेंद्र पवार
मिरज: राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची तस्करी करणाऱ्या आंतरराज्य टोळीवर मिरज पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. महात्मा गांधी चौक पोलिसांनी कर्नाटकातून महाराष्ट्रात गुटखा पुरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत तब्बल १७.९५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात गुटखा व सुगंधी तंबाखूवर बंदी असतानाही कर्नाटकातून माल आणून सांगली जिल्ह्यातील पानटपाऱ्यांना चढ्या दराने विक्री केली जात होती. याबाबतचे वृत्त मिळाल्यानंतर महात्मा गांधी चौक पोलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांनी मुख्तार मुजावर या संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडे तपासणीअंती ८२,६०० रुपयांचा सुगंधी तंबाखू साठा आढळून आला. पोलिसांनी अधिक तपास केला असता, कर्नाटकातून मोठ्या प्रमाणावर गुटखा तस्करी होत असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर एक विशेष पथक तयार करून कर्नाटकात पाठवण्यात आले. या कारवाईत मुख्तार मुजावर, नवीन शेख व कुडचे यांच्याकडून गुटखा, पान मसाला व तंबाखू असा एकूण १७.९५ लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. ही कारवाई नशामुक्ती अभियानांतर्गत करण्यात आली असून, टोळीचा नेटवर्क व वितरण साखळी उध्वस्त करण्यात आली आहे. या प्रकरणी संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल असून पोलिसांचा तपास सुरु आहे.



