नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

तक्रारीचा राग धरून दोन हात, पाय डोके धडापासून वेगळे

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨प्रतिनिधी:- संजय दिंडे कोल्हापूर

कोल्हापुर:- वारंवार तक्रार करीत असल्याचे कारणाने मयत लखन आण्णाप्पा बेनाडे वय 32 रा रांगोळी ता. हातकलंगले जि कोल्हापुर याचा धारधार शस्त्राने वार करत दोन हात,पाय डोके धडापासून वेगळे करून पोत्यात घालून पुरावा नष्ट करण्यासाठी संकेश्वर येथील नदीत पात्रत टाकुन दिले.
पोलिस ठाण्यातुन मिळालेली माहिती अशी की यातील फिर्यादी निता उमाजी तडाखे वय 35 व्यवसाय गृहिणी रा. आवळे गल्ली इंचलकरंजी ता. हातकणंगले जिल्हा कोल्हापूर. हिचा मयत लखन बेनाडे राहणार रांगोळी हा भाऊ असुन दिनांक 16/07/2025 रोजी शिवाजीनगर पोलीस ठाणे, इचलकरंजी येथे बेपत्ता झालेबाबत तक्रार दिली होती. शिवाजीनगर पोलीस ठाणे कडुन इचलकरंजी पोलीस ठाणेकडे मिसिंग तक्रार वर्ग करणेत आली त्याचा मिसिंग रजि. नंबर 27/2025 नुसार तपास इचलकरंजी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापुर यांनी समांतर तपास सुरु केला तपासामध्ये मयत लखन बेनाडे याने लक्ष्मी घस्ते हिचे विरुद्ध वेगवेगळ्या पोलीस ठाणेत तक्रार करत असलेचा राग मनात धरुन आरोपीत विशाल बाबुराव घस्ते,आकाश उर्फ माया विधक घस्ते दोघे रा. तामगाव, ता. करवीर, जि. कोल्हापुर
संस्कार महादेव सावर्डे रा. देवाळे ता. करवीर, जि.कोल्हापुर, अजित उदय चुडेकर रा. राजकपुर पुतळा जुना वाशी नाका कोल्हापूर लक्ष्मी विशाल घस्ते रा. राजेंद्रनगर कोल्हापूर यांनी तवेरा गाडीतुन येऊन कोल्हापूर सायबर चौक येथून शाहू टोलनाका पर्यंत पाठलाग करुन जबरदस्तीने गाडीत घालुन संकेश्वर जिल्हा बेळगाव कर्नाटक येथे घेवुन जावुन त्याचेवर तलवार, एडका, चॉपर या धारधार हत्याराने वार करून मयताचे दोन्ही हात पाय,डोके धडापासुन वेगळे करून ते पोत्यात घालुन पुरावा नष्ट करणेचे उद्देशाने संकेस्वर येथील नदीत टाकुन दिले होते. इचलकरंजी पोलीस ठाणे कोल्हापुर येथे समक्ष दिलेने इचलकरंजी पोलीस ठाणे येथे गुर.नं. 00/2025 भा.न्या.सं. कलम 140(1), 103(1), 189(3)(4), 190, 238, 61(2) महाराष्ट्र पोलीस अधिनीयम कलम 371 म. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यातील वापरलेले वाहन तवेरा गाडी ताब्यात घेतले असून गुन्ह्याची सुरुवात राजारामपुरी पोलीस ठाणे हद्दीतुन सुरु झालेने गुन्हा CCTNS कार्यप्रणालीव्दारे इकडील राजारामपुरी पोलीस ठाणेस आज दिनांक 18/07/2025 रोजी 04.33 वाजता वर्ग करण्यात आलेने गुन्हा दाखल करणेत आलेला आहे. राजारामपुरी पोलीस ठाणेचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलिस निरीक्षक भारत साळुंखे हे तपास करीत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:07 pm, February 26, 2026
31°C
साफ आकाश
23 %
12 Km/h
Wind Gust: 14 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!