DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- मनोहर गोरगल्ले
पुणे:- आळेफाटा दि १७. आळेफाटा पोलीस स्टेशन यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,आयशर कंपनीचा ट्रक क्रमांक MH 04HD 7350 यामधून बेकायदा गुटख्याची वाहतूक होणार असून सदर ट्रक हा नाशिक बाजूकडून आळेफाटा कडे येणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने नाकाबंदी करीत असताना आयशर कंपनीचा ट्रक क्रमांक MH 04HD 7350 मिळवून आल्याने ट्रक मालकास नाव, पत्ता विचारले असता उडवाउडवी चे उत्तर देऊ लागल्याने सदरचा ट्रक चेक केला असता यामध्ये विना परवाना बेकायदेशीर रित्या महाराष्ट्र राज्य मध्ये प्रतिबंधित असलेला विमल कंपनीची सुगंधित मसाला व सुगंधित तंबाखू असा एकूण २८, ३६, ८००/-रुपयांचा मुद्दे माल मिळून आला. त्यामुळे ट्रक चालक सादिक अब्दुलवहाव शेख (४३ वर्षे )चुनारगल्ली, चोपडा ता. चोपडा जि. जळगाव यांच्या विरोधात आळेफाटा पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून एकूण ४३,३६, ८००/-किंमतीचा ट्रकसह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. असेच आरोपी सादिक अब्दुलवहाव शेख यांना गुन्ह्याच्या तपासकामी अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी ही संदीपसिंग गिल्ल पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, रमेश चोपडे अपर पोलीस निरीक्षक पुणे विभाग, रविंद्र चौधरी उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वास जाधव, पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील, पो.हवा. पोपट कोकाटे, विनोद गायकवाड, पंकज पारखे, अमित मालुंजे, पंडित थोरात, पो.कॉ नवीन अरगडे, शैलेश वाघमारे, गणेश जगताप, ओंकार खुणे, संतोष साळुंखे, भुजंगराव सुकाळे पोलीस मित्र मंगेश कदम, सोमेश्वर भंडलकर यांनी केली.



